मोफत मिळणार Truecaller मधील फिचर; अॅपमध्ये आला मोठा अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 05:10 PM2021-11-26T17:10:13+5:302021-11-26T17:10:21+5:30
Truecaller नं अॅपचं नवीन व्हर्जन सादर केलं आहे. Truecaller 12 अपडेटमध्ये Android अॅपवर नवीन कॉल रेकॉर्डिंग फीचर जोडण्यात आलं आहे.
Truecaller नं Android अॅपमध्ये नवीन कॉल रेकॉर्डिंग फीचर जोडलं आहे. तसेच कंपनीनं Truecaller 12 व्हर्जनच्या माध्यमातून अॅपचा युजर इंटरफेस देखील बदलला आहे. ज्यात कॉल आणि SMS साठी नवीन टॅब मिळतील. या बदलामुळे युजर अॅपच्या माध्यमातून वॉयस/व्हिडीओ कॉलिंग आणि मेसेज करणं सोपं होईल. पुढे आम्ही Truecaller मधील नवीन फीचर्सची माहिती दिली आहे.
व्हिडीओ कॉलर आयडी (Video Caller ID)
यात युजरला कॉल आल्यावर एक व्हिडीओ क्लिप मिळेल. या क्लिपमधून कॉल कोणी केला आहे ते समजेल. युजर स्वतःचा व्हिडीओ अपलोड करू शकतील किंवा टेम्पलेटमधील एक व्हिडीओ क्लिप आपली व्हिडीओ कॉलर आयडी (Video Caller ID) म्हणून सेट करू शकतील. ही व्हिडीओ कॉलर आयडी फोनबुक कॉन्टॅक्ट आणि वेरिफाइड बिजनेस कॉल्ससाठी देखील विजिबल असेल.
वॉयस कॉल रेकॉर्डिंग (Voice Call Recording)
याआधी फक्त प्रीमियम युजर्ससाठी असलेलं हे फिचर आता फ्री व्हर्जन युजरसाठी देखील उपलब्ध झालं आहे. परंतु यासाठी फोनमधील Android व्हर्जन 5.1 आणि त्यापेक्षा वरचं असायला हवं. या फीचरच्या माध्यमातून युजर कोणताही वॉयस कॉल रेकॉर्ड करू शकतील. यातील ऑटोमैटिक मोड आलेले किंवा केलेले सर्व कॉल रेकॉर्ड करून युजरच्या डिवाइसमध्ये ठेवतो.
घोस्ट कॉल आणि कॉल अनाउंस (Ghost Call and Call Announce)
हे फीचर सध्या Truecaller प्रीमियम युजरसाठी आलं आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर फेक कॉल सेट करू शकतील. नको असलेल्या लोकांसोबत अडकल्यास तुम्ही फेक कॉल शेड्युल करून त्या बहाण्याने तिथून निघू शकता. तर कॉल अनाउंस फीचर आलेल्या कॉलरचे कॉन्टॅक्टमधील नाव अनाउंस करेल.