चार्जिंगचं झंझट नाही! 10 दिवसांच्या बॅटरी लाईफसह परवडणाऱ्या किंमतीत Smartwatch भारतात लाँच
By सिद्धेश जाधव | Updated: March 12, 2022 13:28 IST2022-03-12T13:28:23+5:302022-03-12T13:28:43+5:30
Truke Horizon W20 स्मार्टवॉच भारतात बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आलं आहे. यात SpO2 सेन्सर, Heart Rate मॉनिटर, ब्लड प्रेशर मॉनिटर, असे अनेक हेल्थ फीचर्स मिळतात.

चार्जिंगचं झंझट नाही! 10 दिवसांच्या बॅटरी लाईफसह परवडणाऱ्या किंमतीत Smartwatch भारतात लाँच
Truke Horizon W20 स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आलं आहे. यात कंपनीनं 300mAh ची बॅटरी दिली आहे, जी 7 ते 10 दिवसांपर्यंतचा बॅटरी लाईफ देते. तसेच यात यात हार्ट रेट सेन्सर, SpO2, ब्लड प्रेशर मॉनिटर असे अनेक हेल्थ फीचर्सही मिळतात. कंपनीनं Truke Horizon W20 ची किंमत 2,999 रुपये ठेवली आहे. हे वॉच Flipkart वरून ब्लॅक, ग्रीन आणि रेड कलरमध्ये विकत घेता येईल. खरेदीच्या वेळी Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 5 टक्क्यांपर्यंतचा अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल.
स्पेसिफिकेशन्स
या स्मार्ट वॉचमध्ये 1.69 इंचाचा फुल एचडी कलर आयपीएस टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टच डिस्प्ले 240×280 पिक्सल रेजोल्यूशनला सपोर्ट करतो. यातील 100 पेक्षा जास्त वॉच फेस तुम्ही तुमच्या मूडनुसार बदलू शकता. हे वॉच Android आणि iOS डिवाइससह कम्पॅटिबल आहे. जीपीएस सपोर्टसह यात वॉटर रेजिस्टन्स रसिस्टेंट डिजाइन देण्यात आली आहे.
कंपनीनं यात 24×7 हार्ट रेट मॉनिटर सेन्सर दिला आहे. तसेच ट्रू ब्लड ऑक्सिजन लेव्हल SpO2 मॉनिटरिंग फीचर, ब्ल्ड प्रेशर मॉनिटर, स्लिप आणि स्टेप ट्रेकर इत्यादी फीचर्सही मिळतात. या वॉचमध्ये आउटडोर रनिंग, इंडोर रनिंग व सायकलिंग इत्यादी अनेक स्पोर्ट्स मोड मिळतात. यातील 300mAh ची बॅटरी 7 ते 10 दिवस पर्यंतचा बॅटरी बॅकअप देते. तसेच या वॉचचा स्टॅन्डबाय टाइम 45 दिवस आहे. हे वॉच मॅग्नेटिक चार्जरनं चार्ज करता येतं.
हे देखील वाचा:
- पबजी खेळून कंटाळा आलाय? Call of Duty चा नवीन मोबाईल गेम येतोय; कंपनीनं देतेय नोकरीची संधी
- स्वस्तात घेऊन टाका 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन; Realme C35 चा पहिला सेल आज
- बजेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; रियलमी-रेडमीनंतर ‘या’ कंपनीच्या स्वस्त 5G फोनची होतेय भारतात एंट्री