टंबो मोबाईल्सचे भारतात पदार्पण
By शेखर पाटील | Published: May 31, 2018 06:10 PM2018-05-31T18:10:57+5:302018-05-31T18:10:57+5:30
टंबो मोबाईल्स या कंपनीने भारतीय स्मार्टफोनच्या बाजारपेठेत प्रवेश करत टंबो टीए-३ हे मॉडेल ग्राहकांना सादर केले आहे.
टंबो मोबाईल्स या कंपनीने भारतीय स्मार्टफोनच्या बाजारपेठेत प्रवेश करत टंबो टीए-३ हे मॉडेल ग्राहकांना सादर केले आहे.
टंबो मोबाईल्स कंपनी भारतात आपली उत्पादने सादर करणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच आली होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. या कंपनीने टंबो टीए-३ या मॉडेलच्या माध्यमातून बाजारपेठेत एंट्री केली आहे. या मॉडेलचे मूल्य ४,९९९ रूपये आहे. भारतात एंट्री लेव्हलचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात विकले जातात. नेमकी हीच बाब लक्षात घेत, या कंपनीनेही याच सेगमेंटवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. हा स्मार्टफोन जेट ब्लॅक, शँपेन आणि मेटॅलिक ब्ल्यू या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये ऑफलाईन पध्दतीत बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये ४.९५ इंच आकारमानाचा डिस्प्ले देण्यात आला असला तरी याचे रेझोल्युशन मात्र नेमके सांगण्यात आलेले नाही. यामध्ये मीडियाटेकचा क्वॉड-कोअर एमटी६७३७ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोअरेज ६४ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे.
टंबो टीए-३ या मॉडेलमध्ये ड्युअल फ्लॅशयुक्त ५ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एलईडी फ्लॅशयुक्त ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे हे एंट्री लेव्हलचे मॉडेल असले तरी यात फेस अनलॉक हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. तर याच्या कॅमेर्या अॅपमध्ये ब्युटीसह विविध मोड प्रदान करण्यात आले आहेत. तर यातील बॅटरीची क्षमता आणि अँड्रॉइड ओएसच्या आवृत्तीबाबत मात्र माहिती देण्यात आलेली नाही. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.