जुन्या पंख्यालाच बनवा रिमोटवाला पंखा; हे छोटेसे एक डिव्हाईस बोर्डवर लावा, घरातील सर्व लाईटही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 12:16 IST2025-03-21T12:15:52+5:302025-03-21T12:16:08+5:30
जुना फॅन असेल तर त्याची हवा कमी जास्त करायला सारखे सारखे उठावे लागते. आताच्या आरामदायी जीवनशैलीमुळे त्याचा कंटाळा येतो. फॅन तसाच फास्ट चालू राहिल्याने वीजही वाया जाते.

जुन्या पंख्यालाच बनवा रिमोटवाला पंखा; हे छोटेसे एक डिव्हाईस बोर्डवर लावा, घरातील सर्व लाईटही...
जर तुमच्या घरात जुने पंखे आहेत, तुम्हाला महागडे रिमोटवाले पंखेही घ्यायचे नाहीत. तर मग तुमच्यासाठी एक स्मार्ट डिव्हाईस आले आहे. जे तुमच्या बटनांच्या बोर्डवर लावले की तुम्ही आरामात बसल्या जागेवरून रिमोटद्वारे फॅनचा वेग कमी जास्त, चालू बंद करू शकणार आहात. एवढेच नाही तर हे एकच डिव्हाईस तुमचे अनेक लाईट, फॅनही मॅनेज करू शकणार आहे.
जुना फॅन असेल तर त्याची हवा कमी जास्त करायला सारखे सारखे उठावे लागते. आताच्या आरामदायी जीवनशैलीमुळे त्याचा कंटाळा येतो. फॅन तसाच फास्ट चालू राहिल्याने वीजही वाया जाते. यापासून तुम्हाला वाचता येणार आहे. सध्याचे रिमोट कंट्रोलचे फॅन २५०० रुपयांपासून सुरु होतात. परंतू या जुन्या पंख्याला तुम्ही केवळ ६०० रुपयांत कंट्रोल करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही.
एक छोटे डिव्हाईस तुमची समस्या दूर करू शकते. अमेझॉनवर ते उपलब्ध आहे. हे डिव्हाईस पंख्यावर नाही तर इलेक्ट्रीक स्वीच बोर्डवर बसवायचे आहे. जर तुम्हाला रिमोटवर फंखा किंवा ट्यूबलाईट कंट्रोल करायचा असेल तर तुम्ही ते खरेदी करू शकता. RE CO SYS Remote Control Switch for Light and Fan असे याचे नाव आहे. या डिव्हाईसला वायफाय आणि आयआर ब्लास्टरचा सपोर्ट आहे.
यामुळे तुम्ही अॅलेक्सा आणि मोबाईलद्वारेही ते कंट्रोल करू शकता. आणखी एक महत्वाचे फिचर म्हणजे यात तुम्ही स्लीप आणि टायमर देखील सेट करू शकता. नुसता एक फॅनच नाही तर तुम्ही सहा लाईट आणि तीन फॅनपर्यंत या डिव्हाईसवर कनेक्ट करू शकता. यासाठी तुम्हाला तसे मॉडेल घ्यावे लागणार आहे.