ट्विटर दीड तासांपासून ठप्प होते; युजर्स त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 02:42 PM2019-10-02T14:42:07+5:302019-10-02T14:42:20+5:30
ट्विट करायला गेल्यास युजरला Allready tweeted असा मॅसेज दिसत होता.
सोशल मिडीया साईट ट्विटर दुपारपासून ठप्प झाले होते. यामुळे युजर ट्विटरवर पोस्ट करू शकत नव्हते. तर पहाटेपासून ट्विटडेकही बंद पडले होते.
ट्विट करायला गेल्यास युजरला Allready tweeted असा मॅसेज दिसत होता. मोबाईल अॅपला ही समस्या नव्हती. केवळ डेस्कटॉपवर ही समस्या येत होती. ट्विटरचे अँड्रॉईड आणि आयओएसवरील अॅप काम करत होते.
We've been experiencing outages across Twitter and TweetDeck. You might have had trouble Tweeting, getting notifications, or viewing DMs. We're currently working on a fix, and should be back to normal soon.
— Twitter Support (@TwitterSupport) October 2, 2019
ट्विटडेकने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. तर ट्विटरने मान्य करत नोटिफिकेशन, मॅसेज पाठविणे आणि ट्विट करण्याची समस्या असल्याचे सांगितले. जवळपास दीड तासांनंतर ट्विटर पूर्ववत सुरू झाले. ही समस्या मंगळवारी रात्रीपासूनच येत असल्याचे समजते. यामुळे युजर मोबाईल अॅपवर जात होते.