न्यूडिटीमुळे टि्वटरने 43 हजारांहून अधिक अकाउंट्सवर घातली बंदी, पाहा आरोपांची यादी...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 04:46 PM2022-08-02T16:46:13+5:302022-08-02T16:46:40+5:30
ट्विटरने फक्त जून महिन्यातच 43 हजारांहून अधिक खाते बंद केले आहेत.
Twitter News: मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने मिळालेल्या तक्रारींच्या आधारे जून महिन्याची एक रिपोर्ट सादर केली आहे. त्या रिपोर्टनुसार, कंपनीने जून महिन्यात 43,143 हून अधिक खात्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. या कारवाईत सर्वाधिक 536 प्रकरणे गैरवर्तन आणि छळाशी संबंधित आहेत, तर 134 प्रकरणे दुर्भावनापूर्ण आणि द्वेषाशी संबंधित आहेत.
रिपोर्टनुसार, ट्विटरने लैंगिक हिंसा, नग्नता आणि संबंधित प्रकरणांमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून 40,982 खाती काढून टाकली आहेत. यातील 2158 खाती हिंसा आणि दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपामुळे काढून टाकण्यात आली. ट्विटरकडे भारतातून 724 तक्रारी आल्या होत्या. ट्विटरने तयार केलेल्या स्थानिक यंत्रणेद्वारे या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 26 मे 2022 ते 25 जून 2022 दरम्यान आलेल्या तक्रारींच्या आधारे ट्विटरने कारवाई केली आहे. ट्विटरने एकूण 122 URL वर कारवाई केली आहे.
या आरोपांखाली कारवाई
दहशतवाद पसरवणे
नग्नता पसरवणे
लैंगिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणे
गैरवर्तन आणि छळ
बाल लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणे
दर महिन्याला अहवाल दिला जातो
सरकारने केलेल्या नवीन IAT कायदा 2021 नुसार, देशातील त्या सोशल मीडिया खात्यांना दर महिन्याला अहवाल जारी करावा लागतो, ज्यांचे 5 दशलक्षाहून अधिक युजर्स आहेत. ट्विटरला या नियमांतर्गत अंतर्गत दर महिन्याला अहवाल जारी करावा लागतो. या अहवालात ट्विटरने किती तक्रारींवर कारवाई केली याची माहिती द्यावी लागते.