ट्विटरवरटचे बदल काही केल्या संपेना! आता Like चं बटण हटवलं जाणार अन् त्याजागी...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 09:42 AM2023-08-31T09:42:20+5:302023-08-31T09:48:53+5:30

कधी लोगो, तर कधी ब्लू टीक असे वेगवेगळे बदल ट्विटरवर पाहायला मिळाले आहेत.

Twitter changes have not yet ended as Now the Like button will be removed and replaced by X with black color | ट्विटरवरटचे बदल काही केल्या संपेना! आता Like चं बटण हटवलं जाणार अन् त्याजागी...

ट्विटरवरटचे बदल काही केल्या संपेना! आता Like चं बटण हटवलं जाणार अन् त्याजागी...

googlenewsNext

Twitter Like Button Changes: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आता X या नावाने ओळखले जात आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर काही दिवसांतच त्याच्यात बदल करण्यास सुरुवात केली. सुरूवातीला हे बदल एकत्र होतील, किंवा मर्यादित स्वरूपाचे असतील असे वाटत होते. पण गेल्या काही आठवड्यांमध्ये मस्क यांच्या टीमकडून ट्विटरवर सातत्याने बदल घडताना दिसत आहेत. कधी लोगो, तर कधी ब्लू टीक असे वेगवेगळे बदल ट्विटरवर पाहायला मिळाले आहेत. त्यातच आता युजर्सना लवकरच आणखी एक वेगळा बदल पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. या बदल ट्वीटच्या लाईक या बटणाशी संबंधित आहे.

नक्की काय बदलणार?

ट्विटर म्हणजेच आताचे X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज लाखो-करोडो लोक आपली मतं मांडत असतात, एकमेकांच्या ट्विट्सला रिट्विट करत असतात. त्यातच ट्विटला लाइक करणाऱ्यांची संख्याही मोठी असते. त्यामुळे आता मस्क यांच्या टीमने ट्विटरच्या लाइक बटणामध्येच बदल करायचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ट्विट लाइक करण्याचे बटण हे हार्टच्या आकारमध्ये आहे. जेव्हा तुम्ही ट्विट लाइक करता, तेव्हा बटणाचा रंग लाल होतो. परंतु आता यात बदल होणार आहे. एखादे ट्विट लाइक केल्यानंतर त्याजागी X असे चिन्ह दिसणार आहे. तसेच, ट्विट लाइक केले की ते चिन्ह काळं होईल असे सांगितले जात आहे. त्यानंतर मग लाल हार्ट पुन्हा दिसू लागेल.

ट्विटरवर बदलांची मालिका

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा पदभार स्वीकारल्यापासून नावापासून ते लोगोपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. सर्वप्रथम एक्स प्लॅटफॉर्मवर ब्लू टीक मोफत होते, ते पेड सबस्क्रिप्शन करण्यात आले. ब्लू सबस्क्रिप्शन असलेल्या वापरकर्त्यांसाठी एडिट बटण, टेक्स्ट लिमिट मध्ये शिथिलता यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच लोगोही बदलण्यात आले.

Web Title: Twitter changes have not yet ended as Now the Like button will be removed and replaced by X with black color

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.