खूशखबर ! ट्विटरकडून नाव मोठं करायची संधी, युजर डिस्प्ले नेमची मर्यादाही वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 12:34 PM2017-11-11T12:34:28+5:302017-11-11T12:40:03+5:30

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने एकाच आठवड्यात युजर्ससाठी अजून एक खूशखबर आणली असून युजरनेम डिस्प्लेची अक्षरसंख्या वाढवली आहे. त्यामुळे मोठं नाव असतानाही अक्षरसंख्या लिमिट असल्याने शॉर्टमध्ये लिहावं लागणा-यांची चिंता मिटली आहे

Twitter doubles length of user display names to 50 characters | खूशखबर ! ट्विटरकडून नाव मोठं करायची संधी, युजर डिस्प्ले नेमची मर्यादाही वाढली

खूशखबर ! ट्विटरकडून नाव मोठं करायची संधी, युजर डिस्प्ले नेमची मर्यादाही वाढली

googlenewsNext
ठळक मुद्देट्विटरने युजरनेम डिस्प्लेची अक्षरसंख्या वाढवली आहेट्विटरने युजरनेम डिस्प्ले अक्षरसंख्या लिमिट 20 हून थेट 50 वर नेली आहे

मुंबई - मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने एकाच आठवड्यात युजर्ससाठी अजून एक खूशखबर आणली असून युजरनेम डिस्प्लेची अक्षरसंख्या वाढवली आहे. त्यामुळे मोठं नाव असतानाही अक्षरसंख्या लिमिट असल्याने शॉर्टमध्ये लिहावं लागणा-यांची चिंता मिटली आहे. ट्विटरने युजरनेम डिस्प्ले अक्षरसंख्या लिमिट 20 हून थेट 50 वर नेली आहे. मर्यादा वाढवल्याने युजर आता आपल्या नावासोबत इमोजीदेखील अॅड करु शकणार आहेत. काही युजर्सनी ट्विटरच्या या नव्या फिचरचं कौतूक केलं असून, काहींनी मात्र यापेक्षाही महत्वाचे आणि गंभीर बदल गरजेचे असताना ट्विटर या असल्या छोट्या गोष्टींकडे लक्ष का देत आहे अशी विचारणा केली आहे. 

तुमचं डिस्प्ले नाव बदलायचं असल्यास ट्विटर प्रोफाईलवर जाऊन उजव्या हाताला वरच्या बाजूला येणा-या 'एडिट प्रोफाईल' ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. यानंतर करंट डिस्प्ले नेमवर क्लिक करा. महत्वाचं म्हणजे युजर फक्त डिस्प्ले नेममध्येच बदल करु शकतात, '@user' नेमवर नाही. दरम्यान, ट्विटरवर सामोरं जावं लागणा-या छळवणुकीवरुन युजर्सकडून सतत नाराजी व्यक्त केली जात आहे. 

याआधी आठवड्याच्या सुरुवातीला ट्विटरने ट्विटमधील अक्षरसंख्या वाढवण्याचा निर्णय घेत युजर्सला आश्चर्याचा धक्का दिला होता. ट्विट करण्यासाठी असलेली 140 अक्षरांची मर्यादा वाढवण्यात आली आहे. अक्षरमर्यादेत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. ट्विटरवर आधी 140 अक्षरांची मर्यादा होती. मात्र आता ती दुप्पट म्हणजेच 280 अक्षरांची करण्यात आली आहे. त्यामुळे आता ट्विट करताना अक्षर मर्यादेचा जास्त विचार करायची आवश्यकता नाही. पण चायनिज, जापनीज आणि कोरियन भाषेत ट्वीट करणाऱ्यांना मात्र आधीचीच अक्षरमर्यादा आहे. याचा फायदा मराठी भाषेत ट्वीट करण्यांनाही होत आहे. कारण मराठी भाषेत ट्वीट करताना काना, मात्रा, उकार मोजले जातात. त्यामुळे अक्षर मर्यादा लवकर संपत होती. 

जपानी, कोरियाई किंवा चीनी भाषेत एका कॅरेक्टरमध्ये दुप्पट माहिती देता येते पण इंग्रजी भाषेत हे शक्य नाही. अनेक जणांना 140 कॅरेक्टरमध्ये व्यक्त होता येत नसल्याने ते लोकं ट्विटच करत नाहीत. कॅरेक्टर लिमिट वाढल्याने ट्विट न करणारे लोकंही ट्विट करतील असा विश्वास ट्विटरकडून व्यक्त करण्यात आला होता.  
 

Web Title: Twitter doubles length of user display names to 50 characters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.