Twitter वर मिळणार एडिट बटन; चूक सुधारण्याची संधी फक्त ‘या’ लोकांना मिळणार  

By सिद्धेश जाधव | Published: April 18, 2022 11:44 AM2022-04-18T11:44:34+5:302022-04-18T11:44:43+5:30

Twitter Edit Button लवकरच युजर्सना मिळू शकतं. सध्या या फिचरवर काम सुरु असल्याचं काही स्क्रीनशॉट्समधून समोर आलं आहे.  

Twitter Edit Button First Look Leaked Know How It Will Work   | Twitter वर मिळणार एडिट बटन; चूक सुधारण्याची संधी फक्त ‘या’ लोकांना मिळणार  

Twitter वर मिळणार एडिट बटन; चूक सुधारण्याची संधी फक्त ‘या’ लोकांना मिळणार  

Next

Twitter गेले अनेक दिवस चर्चेचा विषय बनला आहे. Elon Musk नं काही दिवसांपूर्वी कंपनी विकत घेण्याची ऑफर दिली होती. आता ट्विटरवर बहुप्रतीक्षित Edit Button फीचर येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या फीचरची माहिती कंपनीनं याआधी देखील दिली होती. तर आता हे फीचर काही निवडक बीटा युजर्स आणि डेव्हलपर्ससाठी रोल आउट करण्यात आलं आहे.  

क्रिएटर आणि डेव्हलपर Jane Manchun Wong यांनी ट्वीट करून Edit Button फीचरबाबत नवीन माहिती दिली आहे. सध्या हे फिचर टेस्टिंगमध्ये उपलब्ध झालं नाही परंतु काही डेव्हलपर्सकडे याचा अर्ली अ‍ॅक्सेस देण्यात आला आहे. या युजर्सनी शेयर केलेल्या स्क्रीनशॉट्समधून आगामी फिचरची माहिती मिळाली आहे. त्यानुसार, एडिट बटनचा पर्याय तीन डॉट्समध्ये मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर ट्विटमधील टेक्स्ट बदलण्यात येईल.  

Twitter Edit Button कोणाला मिळणार  

Twitter Edit Button सध्या तरी काही काही डेव्हलपर्स आणि क्रिएटर्सकडे उपलब्ध झालं आहे. ही या फिचरची सुरुवात आहे. त्यामुळे यात अनेक बदल होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे 5 एप्रिलला Elon Musk नं ट्विटरवर एडिट बटनबद्दल एक पोल घेतला होता. त्यांनतर 6 तारखेला स्वतः ट्विटरनं या फिचरची माहिती दिली होती. आता या फिचरच्या टेस्टिंग फेजचे स्क्रिनशॉट येऊ लागले आहेत.  

लवकरच हे फिचर ट्विटरवर देखील दिसू लागेल. परंतु थेट हे फिचर सर्वांसाठी खुलं केलं जाणार नाही. या फिचर सर्वप्रथम ‘ट्विटर ब्लू’ युजर्सना देण्यात येईल. ही कंपनीची पेड सर्व्हिस आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार एडिट बटन फक्त पैसे देणाऱ्या युजर्सना मिळेल, असा दावा करत आहेत. तर काही रिपोर्ट्समध्ये हे फिचर सर्व युजर्सना देण्यात येईल, असं सांगत आहेत. चित्र स्पष्ट होण्यासाठी आपल्याला काही दिवस वाट बघावी लागेल.  

Web Title: Twitter Edit Button First Look Leaked Know How It Will Work  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.