Twitter Edit Button Update: मस्तच! फेसबुक पोस्टसारखंच आता ट्विटही 'एडिट' करता येणार; फक्त...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 01:49 PM2022-11-03T13:49:12+5:302022-11-03T13:49:49+5:30
Twitter Edit Button Update: ट्विटरचे नवे 'बॉस' इलॉन मस्क मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आता अधिक सक्षम करण्यासाठी कामाला लागले आहेत.
Twitter Edit Button Update: ट्विटरचे नवे 'बॉस' इलॉन मस्क मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आता अधिक सक्षम करण्यासाठी कामाला लागले आहेत. येत्या आठवड्याच्या सुरुवातीलाच मस्क ट्विटरवर पहिला सर्वात मोठा बदल म्हणजे युझर्सना ट्विट एडिटचा पर्याय उपलब्ध करुन देण्याची दाट शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीनं ट्विट एडिटिंग पर्याय लॉक केला होता. जो ४.९९ डॉलरच्या ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनसाठी फक्त काही देशांमधील युझर्ससाठी उपलब्ध आहे. आता मस्क यांनी युझर्सना एडिटचा पर्याय उपलब्ध करुन दिला तर युझर्सना त्यांनी केलेले ट्विट पब्लिश झाल्यानंतर एडिट देखील करता येणार आहे. ट्विटरनं याआधी पोस्टच्या तळाशी 'Last Edited' असं दर्शविणारं त्यांचं एक ट्विट करून, येऊ घातलेल्या Edit बटणाची झलक दाखवली होती.
१२ तास काम, साप्ताहिक सुट्टी रद्द; नियम माेडणाऱ्यांना कामावरून काढणार, मस्क यांची घोषणा
युझरनं एकदा ट्विट एडिट केलं की त्या ट्विट खाली Last Edited असा पर्याय दिसू लागेल. यावर क्लिक केल्यावर युझरनं आपल्या ट्विटमध्ये नेमका काय बदल केला याची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे. महत्वाचं म्हणजे ट्विट एडिट करायची ही सुविधा फक्त ट्विटरच्या ब्लू सबस्क्राइबर्सनाच उपलब्ध होणार असल्याचं याआधीच जाहीर करण्यात आले आहे.
काढायची गरज नाही, ट्विटर कर्मचारी आपणहून नोकरी सोडणार; मस्क यांचे तुघलकी फर्मान...
"टायपिंकच्या चुका दुरुस्त करणे, चुकलेले टॅग बदलणे आणि इतर काही कारणास्तव ट्विटमध्ये बदल म्हणून या फिचरचा विचार करा", असं Twitter नं म्हटलं आहे. आता एडिटेड ट्विट आयकन, टाइमस्टॅम्प आणि लेबलसह दिसतील त्यामुळे वाचकांनाही हे स्पष्टपणे लक्षात येईल युझरनं मूळ ट्विटमध्ये सुधारणा केली आहे.