Elon Musk'च्या एका निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना ट्विटर ऑफिसमध्ये टॉयलेट पेपर आणावा लागला, काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 12:06 PM2023-01-01T12:06:28+5:302023-01-01T12:08:43+5:30
ट्विटरची मालकी इलॉन मस्कच्या ताब्यात आल्यापासून मस्कने मोठे निर्णय घेतले. ब्लू टीकसाठी सबक्रीप्शन, अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याचा मोठा निर्णय घेतला.
ट्विटरची मालकी इलॉन मस्कच्या ताब्यात आल्यापासून मस्कने मोठे निर्णय घेतले. ब्लू टीकसाठी सबक्रीप्शन, अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याचा मोठा निर्णय घेतला. आता इलॉन मस्कच्या एका निर्णयामुळे कर्मचारी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. या निर्णयामुळे कर्मचारी टॉयलेट पेपर घेऊन कार्यालयात येत आहेत. याच कारण म्हणजे मस्क यांनी साफ सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे.
एका अहवालानुसार, ट्विटर मधील साफ सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पगार वाढीची मागणी केली होती. यासाठी कामगारांनी आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे इलॉन मस्क यांनी कामगारांना नोकरीवरुन काढून टाकले.
सीईओंच्या पगारात १५०० टक्क्यांनी वाढ!, आयटी क्षेत्रात दशकभरात असमानता
सफाई कर्मचारी निघून गेल्याने स्वच्छता होत नसल्याने स्वच्छतागृहासह संपूर्ण कार्यालयात घाण व दुर्गंधी पसरली आहे. कारण आता स्वच्छतागृहात आवश्यक वस्तू बदलण्यासाठी सफाई कामगार नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना स्वत:चा टॉयलेट पेपर आणावा लागत आहे.
'ट्विटर हे जमिनीच्या दिशेने वेगाने धावणाऱ्या विमानासारखे आहे, त्याचे इंजिन पेटले आहे आणि नियंत्रणे काम करणे थांबवल्या आहेत. "हेच कारण आहे की मी गेल्या 5 आठवड्यांपासून कॉस्ट कटिंगसाठी वेड्यासारखे काम करत आहे,असं इलॉन मस्क यांनी अलीकडेच एका ट्विटर स्पेसमध्ये म्हटले होते.
ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर मस्कने अनेक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. कॉस्ट कटिंग प्लॅनमध्ये सॅक्रामेंटो येथील कार्यालयात 4 मजल्यांवर बसणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2 मजल्यांमध्ये बसावे लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांनीही याविरोधात आवाज उठवला असून यामुळे ट्विटरच्या कामगिरीवर परिणाम होणार असल्याचे सांगितले आहे.
2022 मध्ये इलॉन मस्कची सुमारे 200 अब्ज डॉलर संपत्ती कमी झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सने नुकतीच याबाबत माहिती दिली आहे. जानेवारी 2021 मध्ये, मस्कची वैयक्तिक संपत्ती 200 अब्ज डॉलर होती.