पराग अग्रवाल इन अ‍ॅक्शन! पर्सनल फोटो-व्हिडिओ शेअर करण्यासंदर्भात नवे नियम जारी; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 12:13 PM2021-12-01T12:13:46+5:302021-12-01T12:14:37+5:30

पर्सनल फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासंदर्भात नवीन नियम जारी करून काही बंधने घालण्यात आली आहेत.

twitter expands safety policy disallows sharing of private media without consent | पराग अग्रवाल इन अ‍ॅक्शन! पर्सनल फोटो-व्हिडिओ शेअर करण्यासंदर्भात नवे नियम जारी; पाहा, डिटेल्स

पराग अग्रवाल इन अ‍ॅक्शन! पर्सनल फोटो-व्हिडिओ शेअर करण्यासंदर्भात नवे नियम जारी; पाहा, डिटेल्स

googlenewsNext

नवी दिल्ली: सोशल मीडियावर मोठा प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांची निवड करण्यात आली आहे. यातच आता पराग अग्रवाल अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण पर्सनल फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासंदर्भात नवीन नियम आणि निर्बंध जारी करण्यात आले आहेत. 

नवीन नियमांनुसार, यूझरच्या परवानगीशिवाय अन्य कोणी त्यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करु शकणार नाहीत. शोषण विरोधी धोरणाला अधिक मजबूत करण्यासाठी ट्विटरने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. ट्विटर वापरकर्त्यांना अन्य वापरकर्त्याच्या संमतीशिवाय त्यांचे खाजगी फोटो, व्हिडीओ शेअर करण्यावर बंधने घालण्यात आली आहेत.  

Twitter ची याबाबत अधिकृत माहिती

नव्या नियमांच्या अंतर्गत जे युझर्स पब्लिक फीगर नाहीत ते युझर्स ट्विटरला त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ हटवण्याबाबत सांगू शकणार आहेत, जे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय पोस्ट केले केले आहेत. तसेच हे धोरण त्या लोकांसाठी नाही जे प्रसिद्ध व्यक्ती (Public Figure) आहेत. त्यांच्या ट्विट्सला सार्वजनिक हितासाठी शेअर केले जाऊ शकते, असे ट्विटरने म्हटले आहे. ट्विटरच्या मते, खाजगी फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्याने एखाद्या व्यक्तिच्या गोपनियतेचा भंग होऊ शकतो. त्यामुळे त्या व्यक्तीचे भावनिक किंवा शारिरीक नुकसान होऊ शकते. खाजगी माध्यमांचा दुरुपयोग सर्वांनाच प्रभावित करु शकतो. मात्र, महिला कार्यकर्त्या, अल्पसंख्यांक समाजाच्या सदस्यांवर याचा विपरित परिणाम होऊ शकतो, असे ट्विटरने म्हटले आहे.  

दरम्यान, पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आल्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून, ही एक अशी जगभरामध्ये पसरलेली साथ आहे, ज्याबद्दल आम्ही समाधानी आहोत आणि या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. हा इंडियन सीईओ व्हायरस आहे. यावर कोणतीही लस नाही, असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्विटची सध्या जोरदार चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: twitter expands safety policy disallows sharing of private media without consent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.