भारीच! Twitter ने लाँच केलं इन्स्टासारखं 'हे' भन्नाट फीचर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 02:40 PM2020-06-11T14:40:30+5:302020-06-11T14:41:24+5:30
ट्विटर आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. ट्विटरवर फक्त Tweet नाही तर आता Fleet देखील करता येणार आहे.
नवी दिल्ली - मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ट्विटर आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. ट्विटरवर फक्त Tweet नाही तर आता Fleet देखील करता येणार आहे. कारण आता ट्विटरने आणखी एक भन्नाट फीचर आपल्या युजर्ससाठी आणलं आहे. इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट स्टोरीच्या फीचरसारखेच हे नवं फीचर आहे. आयओएस व अँड्रॉईड युजर्ससाठी फ्लीट्स ट्विटरवर उपलब्ध आहे.
ट्विटरवर युजर्सना आतापर्यंत फक्त ट्विट करण्याची सुविधा होती. परंतु, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या स्टोरी आणि स्टेट्सचे फीचर या ठिकाणी नाहीत. मात्र आता ट्विटरवर Fleet या नवीन फीचरच्या मदतीने जेव्हा एखाद्या व्यक्तीने ट्विट केलं तर ते एका वेगळ्या टाईमलाईनवर दिसेल. तसेच 24 तासांनंतर हे आपोपाप गायब होईल. व्हॉट्सअॅप, फेसबुक स्टेट्स आणि इन्स्टाग्राम यासारखे हे नवे आहेत.
ट्विटरवर युजर्सना Fleet करता यावं यासाठी एक नवं बटण देण्यात आलं आहे. ज्यावर क्लिक करून Fleet करता येतं. Fleet अंतर्गत युजर्संना 280 टेक्स्ट कॅरेक्टर अॅड करता येईल. यात फोटो किंवा जीफ फाईल आणि व्हिडिओ सुद्धा पोस्ट करता येईल. ज्या अकाउंट्सला फॉलो केले आहे. त्यांचे फ्लिट वरच्या बाजुच्या टॅबमध्ये दिसेल. कोणत्याही फ्लिटला रिट्विट करता येऊ शकणार नाही. इमोजीसाठी फ्लिटला रिस्पॉन्ड करू शकता येईल. लवकरच हे फीचर जगभरात लाँच करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
भारत जगात भारी! ...म्हणून चीनने केलं भारतीय सैन्याचं कौतुकhttps://t.co/AiktGJqk8Z#IndianArmy#India#China
— Lokmat (@MiLOKMAT) June 11, 2020
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात 'हा' रक्तगट असलेल्या व्यक्तींना दिलासाhttps://t.co/Kx0vwmtJkB#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia#health
— Lokmat (@MiLOKMAT) June 11, 2020
महत्त्वाच्या बातम्या
अरे व्वा! सिंहांची संख्या वाढली; पंतप्रधानांनी दिली देशवासियांना आनंदाची बातमी
CoronaVirus News : 'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात कमी धोका; रिसर्चमधून खुलासा
Jammu And Kashmir : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद
भारतीय लष्कराला सलाम! चीनच्या तज्ज्ञांनीही केलं भरभरून कौतुक!!
CoronaVirus News : पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होणार?; IIT चा चिंता वाढवणारा रिसर्च