रात्रभर डाऊन झालेले Twitter पूर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 12:59 PM2019-07-12T12:59:23+5:302019-07-12T13:09:01+5:30
मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र गुरुवारी (12 जुलै) ट्विटर रात्रभर डाऊन झालं होतं.
नवी दिल्ली - मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र गुरुवारी (12 जुलै) ट्विटर रात्रभर डाऊन झालं होतं. यामुळे जगभरातील ट्विटर युजर्स रात्रभर त्रासले होते. सकाळी सहा वाजता ट्विटर पूर्ववत झाल्याची माहिती मिळत आहे. ट्विटर डाऊन झाल्याने युजर्सना काही अडचणींचा सामना करावा लागला. ट्विटर काही काळ का ठप्प झालं याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही.
गुरुवारी रात्री जगभरातील अनेक लोकांना ट्वीट करता येत नसल्याचा अनुभव आला. अनेकांनी ट्विटर तसेच इतर सोशल मीडियाच्या माध्यमांवर यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ट्विटरविरोधात संतापही व्यक्त केला.
Twitter is back up for some people, and we're working to make sure our service is available to everyone as quickly as possible. The interruption was due to an internal system change, which we're now fixing. We’re sorry for the inconvenience and should be at 100% soon. https://t.co/HXOiFVbgPK
— Twitter Support (@TwitterSupport) July 11, 2019
miss us?
— Twitter (@Twitter) July 11, 2019
ट्विटर सुरू झाल्यानंतरही ट्विटरवरही यूजर्सनी ट्विटर का बंद झालं? याबाबतचे प्रश्न उपस्थित केले होते. या दरम्यान ट्विटरने 'आम्हाला मिस केलंत का?' असं एक ट्वीट केलं. त्यावर युजर्सनेही फनी मीम्स शेअर करून त्यांना उत्तर दिलं आहे. कंपनीचे सीईओ जॅक यांनीही ट्विट केलं. 'ट्विटर अकाउंट डाऊन झालं होतं. मात्र हळूहळू ट्विटर सेवा पूर्वपदावर येत आहे. त्याबद्दल दिलगीर आहोत. आमच्या ऑपरेशन्स आणि इंजिनीयरिंग टीमने प्रचंड मेहनत घेऊन ट्विटर पुन्हा पूर्वपदावर आणलं. त्यांचे आभार' असं ट्वीट जॅक यांनी केलं आहे.
We were down…and now slowly coming back up. Sorry! Grateful for our operations and engineering teams for getting us flying again.
— jack 🌍🌏🌎 (@jack) July 11, 2019
बुधवारी (3 जुलै) व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगभरात डाऊन झालं होतं. तब्बल 9 तासांनंतर सोशल मीडिया पूर्ववत झाल्याची माहिती देण्यात आली. सोशल मीडियाचं डाऊनलोड बंद झाल्याने युजर्सना काही अडचणींचा सामना करावा लागला होता. याबाबत फेसबुकने आता युजर्सची माफी मागितली होती. युजर्सना त्रास झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याची माहिती फेसबुकने दिली. जगभरात कोट्यवधी लोकांना फोटो पाठवण्यासह डाऊनलोडसुद्धा करता येत नसल्याचा अनुभव आला होता. अनेकांनी ट्विटर तसेच इतर सोशल मीडियाच्या माध्यमांवर यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. 'व्यवसाय, नोकरी आणि इतर क्षेत्रातील लोकांना फोटो, व्हिडीओ, फाईल्स पाठवताना आमच्या प्लॅटफॉर्मवर अनेक समस्यांचा सामना करावा लागला. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्यानंतर आता ही समस्या सोडवण्यात आली आहे. युजर्सना यामुळे जो त्रास सहन करावा लागला त्यासाठी आम्ही माफी मागतो.' अशा शब्दांत फेसबुकने दिलगिरी व्यक्त केली होती.
खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर
सोशल मीडियावर एखादी गोष्ट पोस्ट केल्यानंतर त्यामध्ये चूक असल्यास अथवा अन्य काही कारणांमुळे ती पोस्ट एडिट करायची असल्यास एडिटचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र Twitter वर ट्वीट एडिट करता येत नाही. ट्वीटर युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण फेसबुकप्रमाणेच आता लवकरच ट्वीट एडिट करता येणार आहे. एडिटसाठी Twitter एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे. ट्वीटरच्या या फीचरद्वारे युजर्सना एडिट केलेले ट्वीट दिसणार आहे मात्र याआधी केलेले मूळ ट्वीटही दिसणार आहे. ट्वीट एडिट करण्यासाठी आणण्यात येणाऱ्या नव्या फीचरचा युजर्सला फायदा होणार आहे. युजर्सकडे ते ट्वीट डिलीट करण्यासाठी 5 ते 30 सेकंदाचा वेळ असणार आहे. त्याच विंडोमध्ये युजर्स ते एडिट करू शकतात.