Twitter Reels style video: ट्विटरचे टिकटॉक-इंस्टाग्रामच्या पावलावर पाऊल, फीडवर दिसणार उभे व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 02:35 PM2022-10-03T14:35:38+5:302022-10-03T14:36:04+5:30
Twitter TikTok Style Video: ट्विटरच्या फीडमध्ये दिसणार टिकटॉक आणि इंस्टाग्राम रील्ससारखे व्हिडिओ.
Twitter TikTok and Instagram style video: टिकटॉक आणि इंस्टाग्रामप्रमाणे आता ट्विटरवरही व्हिडिओ दिसणार आहेत. ट्विटरने आयओएसवर एक नवीन फीचर आणणार आहे. सोशल मीडिया साइट्सवर व्हर्टिकल व्हिडिओजला मोठे यश मिळाले. हे पाहता आता ट्विटरनेही व्हर्टिकल व्हिडिओमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटर आता आयओएस अॅप युजर्ससाठी इमर्सिव्ह फुल-स्क्रीन व्हिडिओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, ट्विटरचे अपडेटेड इमर्सिव्ह मीडिया व्यूअर एका क्लिकवर व्हिडियो फूल स्क्रीन करेल. यातून तुम्हाला इमर्सिव्ह व्ह्यूइंग व्हिडिओचा अनुभव घेता येईल. याला सुरू करण्यासाठी ट्विटर अॅपमध्ये व्हिडिओवर टॅप / क्लिक करावे लागेल. हा व्हिडिओ टिकटॉक आणि इंस्टाग्राम रील्सप्रमाणे व्हर्टिकल होईल.
व्हिडिओला लाइक, शेअर आणि रिट्विट करता येणार
हे व्हिडिओ ट्विटचा भाग असतील आणि या व्हिडिओला ट्विट-रिट्विट करता येतील. हे नवीन फीचर अॅपच्या एक्सप्लोअर सेक्शनमध्येही मिळेल. एक्सप्लोर सेक्शनमध्ये आा ट्विट्स आणि ट्रेंड्ससोबत व्हिडिओही दिसतील. याशिवाय, ट्विटर इंस्टाग्रामप्रमाणे व्हिडिओ व्ह्यू काउंट फीचरवरही काम करत आहे.