ट्विटरवरून 'हे' खास फीचर हटवलं जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 10:41 AM2018-10-31T10:41:40+5:302018-10-31T10:45:46+5:30
सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर आपल्या अॅपवरून एक खास फीचर हटवण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच 'लाईक' बटन साईटवरून हटवू शकतं.
Next
नवी दिल्ली - सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर आपल्या अॅपवरून एक खास फीचर हटवण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच 'लाईक' बटन साईटवरून हटवू शकतं. 2015 मध्ये ट्विटरने लाईक बटण फीचर लाँच केलं होतं. या फीचरच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीने केलेलं ट्विट लाईक करून त्याला समर्थन देता येते. त्यामुळे अनेकजण लाईक बटणचा वापर करतात.
As we've been saying for a while, we are rethinking everything about the service to ensure we are incentivizing healthy conversation, that includes the like button. We are in the early stages of the work and have no plans to share right now. https://t.co/k5uPe5j4CW
— Twitter Comms (@TwitterComms) October 29, 2018
ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या एका कार्यक्रमात हार्ट आकारात असलेलं लाईक बटण आवडतं नसल्याने लवकरच ते साईटवरून हटवलं जाणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र ही बाब समोर आल्यानंतर युजर्सने याला विरोध केला आहे. लाईक बटण लोकांना पाठिंबा देण्यासाठी मदत करत असल्याचं युजर्सने म्हटले आहे. लाईक फीचर हटवण्याला युजर्सनी विरोध केल्यानंतर ट्विटरने आता फक्त हे बटण हटवण्याबाबत विचार सुरू असल्याचं म्हटलं आहे. तसेच या फीचरबाबत कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आला नसल्याचं म्हटलं आहे.