...म्हणून 22 नोव्हेंबरपासून ट्विटरवर दिसणार नाहीत राजकीय जाहिराती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 10:56 AM2019-10-31T10:56:48+5:302019-10-31T11:06:14+5:30
ट्विटरने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर आता राजकीय जाहिराती दिसणार नाहीत.
नवी दिल्ली - मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ट्विटर आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. मात्र आता ट्विटरने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर आता राजकीय जाहिराती दिसणार नाहीत कारण ट्विटरने सर्व प्रकारच्या राजकीय जाहिराती बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी याबाबत घोषणा केली आहे. ट्वीट करून जॅक यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.
जॅक यांनी 'आम्ही जगभरात सर्व राजकीय जाहिराती रोखण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय संदेश हा इतरांपर्यंत पोहोचवला पाहिजे पण तो विकत घेतला जाऊ नये असं आमचं मत आहे. का? तर काही कारणांसाठी...' असं ट्विट केलं आहे. 15 नोव्हेंबर रोजी याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. 22 नोव्हेंबरपासून ट्विटरवर राजकीय जाहिराती दिसणार नाहीत. हे लागू करण्याआधी जाहिरातदारांना नोटिस देण्यात येणार आहे.
We’ve made the decision to stop all political advertising on Twitter globally. We believe political message reach should be earned, not bought. Why? A few reasons…🧵
— jack 🌍🌏🌎 (@jack) October 30, 2019
'इंटरनेटवर जाहिराती खूप ताकदवान आणि प्रभावी ठरतात. व्यावसायिक जाहिरातींपर्यंत ठिक आहे, पण ही ताकद राजकीय जाहिरातींच्या बाबतीत मोठी जोखीम ठरू शकते. राजकारणामध्ये या जाहिरातींचा उपयोग मतांवर प्रभाव पाडण्यासाठी होऊ शकतो, याचा परिणाम लाखो लोकांच्या जीवनावर होण्याची शक्यता असते' असं देखील जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
While internet advertising is incredibly powerful and very effective for commercial advertisers, that power brings significant risks to politics, where it can be used to influence votes to affect the lives of millions.
— jack 🌍🌏🌎 (@jack) October 30, 2019
ट्विटरवरील थ्रेड अचानक डिलीट झाल्यास ते थ्रेड का गायब झाले याचं स्पष्टीकरण ट्विटर देणार आहे. काही आठवड्यात हे फीचर युजर्सना दिसणार आहे. 'This tweet is unavailabe' च्या जागी ते ट्वीट का गायब झालं याचं कारण दिसणार आहे. ट्विटरवर अनेकदा काही कन्व्हर्सेशनचे ट्वीट गायब झालेले दिसतात. त्यामुळे एखाद्या गोष्टीची जास्तीची माहिती मिळत नाही. ट्वीट गायब झाल्याने लोक गोंधळून जातात. त्यामुळेच ट्विटर आता युजर्सना ट्वीट का गायब झालं यामागचं कारण सांगणार आहे. प्रामुख्याने ट्वीट गायब झाल्यावर 'This tweet is unavailable' असं दाखवण्यात येतं. मात्र आता नवं फीचर रोलआऊट झाल्यावर गायब झाल्यामागचं नेमकं कारण आणि तपशील मिळणार आहे.
खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर
सोशल मीडियावर एखादी गोष्ट पोस्ट केल्यानंतर त्यामध्ये चूक असल्यास अथवा अन्य काही कारणांमुळे ती पोस्ट एडिट करायची असल्यास एडिटचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र Twitter वर ट्वीट एडिट करता येत नाही. ट्वीटर युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण फेसबुकप्रमाणेच आता लवकरच ट्वीट एडिट करता येणार आहे. एडिटसाठी Twitter एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे. ट्वीटरच्या या फीचरद्वारे युजर्सना एडिट केलेले ट्वीट दिसणार आहे मात्र याआधी केलेले मूळ ट्वीटही दिसणार आहे. ट्वीट एडिट करण्यासाठी आणण्यात येणाऱ्या नव्या फीचरचा युजर्सला फायदा होणार आहे. युजर्सकडे ते ट्वीट डिलीट करण्यासाठी 5 ते 30 सेकंदाचा वेळ असणार आहे. त्याच विंडोमध्ये युजर्स ते एडिट करू शकतात.