आता Twitter वर शब्द मर्यादा वाढणार! 280 ऐवजी 4000 शब्दांमध्ये करू शकाल पोस्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 09:35 PM2022-12-11T21:35:01+5:302022-12-11T21:42:54+5:30

Twitter : ट्विटरचे नवे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) या प्लॅटफॉर्ममध्ये मोठे बदल करत आहेत. 

twitter to increase tweet character limit from 280 to 4000 says elon musk | आता Twitter वर शब्द मर्यादा वाढणार! 280 ऐवजी 4000 शब्दांमध्ये करू शकाल पोस्ट!!

आता Twitter वर शब्द मर्यादा वाढणार! 280 ऐवजी 4000 शब्दांमध्ये करू शकाल पोस्ट!!

googlenewsNext

नवी दिल्ली : ट्विटर (Twitter) या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक अतिशय उपयुक्त सुविधा सुरू होणार आहे. सध्या ट्विटर फक्त 280 शब्दांमध्ये ट्विट करण्याची परवानगी देते, ज्यामुळे युजर्सना एक लांब पोस्ट लिहिणे कठीण होते. युजर्सची ही अडचण लवकरच संपणार आहे. दरम्यान, ट्विटरचे नवे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) या प्लॅटफॉर्ममध्ये मोठे बदल करत आहेत. 

आता इलॉन मस्क यांनी सांगितले आहे की, ट्विटर शब्द मर्यादा 280 वरून 4000 पर्यंत वाढवण्यास तयार आहे. इलॉन ओबरे नावाच्या एका ट्विटर युजर्सने त्यांना ट्विटरने शब्द मर्यादा 280 वरून 4000 पर्यंत वाढवली ​​आहे का? असे विचारले असता, इलॉन मस्क यांनी होकारार्थी उत्तर दिले. पूर्वी या प्लॅटफॉर्मवर केवळ 140 शब्दांची मर्यादा होती. ट्विटरने 8 नोव्हेंबर 2017 रोजी शब्द मर्यादा 140 वरून 280 शब्दांवर आणली होती.

विशेष म्हणजे ट्विटरने पुन्हा एकदा 'ट्विटर ब्लू' ही सबस्क्रिप्शन सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनी 12 डिसेंबरपासून ही सेवा पुन्हा सुरू करणार आहे. कंपनीने शनिवारी ट्विट केले की, युजर्स सोमवारपासून ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. वेब ट्विटर युजर्सना या सेवेसाठी दरमहा 8 डॉलर द्यावे लागतील. मात्र, iOS युजर्ससाठी ते थोडे महाग असणार आहे.

iOS युजर्ससाठी ट्विटर ब्लूसेवा प्रति महिना 11 डॉलर असणार आहे, असे कंपनीने जाहीर केले आहे. दरम्यान, नोव्हेंबरच्या सुरुवातीला ट्विटरने ट्विटर ब्लू सुरू केले होते. परंतु, बनावट खाती वाढल्याने ती बंद करण्यात आली. त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी लाँच करण्याची चर्चा होती, परंतु तारीख पुढे वाढवण्यात आली.

Web Title: twitter to increase tweet character limit from 280 to 4000 says elon musk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.