ट्विटरवर आहात...पासवर्ड बदला, ट्विटरवर होता तुमचा पासवर्ड साठवणारा बग!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 07:03 AM2018-05-04T07:03:57+5:302018-05-04T09:50:46+5:30
स्टोअर्ड पासवर्डच्या इंटरनल लॉगमध्ये बग आढळल्याने 33 कोटी युजर्सला ट्विटरने पासवर्ड बदलण्याची विनंती केली आहे.
नवी दिल्ली - सोशल मीडियावरील लोकप्रिय व्यासपीठ असलेल्या ट्विटरने आपल्या युजर्सना पासवर्ड बदलण्याचे आवाहन केले आहे. तसे प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आले आहे. स्टोअर्ड पासवर्डच्या इंटरनल लॉगमध्ये बग आढळल्याने 33 कोटी युजर्सला ट्विटरने पासवर्ड बदलण्याची विनंती केली आहे.
पासवर्ड बदलण्याच्या केलेल्या आवाहनसोबत इंटरनल लॉगमध्ये बग आढळलेल्या बगवर उपाय योजला असल्याचेही ट्विटरने सांगितले आहे. आतापर्यंत एकाही ट्विटर अकाऊंटचा गैरवापर झाल्याची तक्रार आमच्याकडे आलेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून वापरकर्त्यांनी स्टोअर्ड पासवर्ड त्वरित बदलावा, असे आवाहन ट्विटरकडून करण्यात आले आहे.
We recently found a bug that stored passwords unmasked in an internal log. We fixed the bug and have no indication of a breach or misuse by anyone. As a precaution, consider changing your password on all services where you’ve used this password. https://t.co/RyEDvQOTaZ
— Twitter Support (@TwitterSupport) May 3, 2018
संगणक, मोबाइल, लॅपटॉप किंवा कोणत्याही गॅजेटवर तुम्ही ट्विटर अकाऊंट वापरत असाल तर तिथला तुमचा पासवर्ड तुम्ही त्वरित बदलावा असे ट्विटरने म्हटले आहे. या स्वरूपाचा बग पुन्हा येऊ नये यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेतो आहोत असेही ट्विटरने आपल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
असा सुरक्षित ठेवा पासवर्ड
- तुमचा पासवर्ड मोठा असू द्या. पासवर्डमध्ये किमान आठ कॅरेक्टर अवश्य द्या. पण त्यापेक्षा जास्त कॅरेक्टर असणारा पासवर्ड कधीही चांगला ठरेल.
- पासवर्डमध्ये अल्फा न्यूमरीक असावा. यामध्ये एक कॅपिटल अक्षर, एक अंक आणि एखादं स्पेशल कॅरॅक्टर असावं. जसे की - Abcd@789
- कधीही आपल्या स्वत:चं किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर आधारित पासवर्ड बनवू नका
- पासवर्ड सेट करताना अशा अंकांचा वापर करु नका जे तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे, उदाहरणार्थ वाढदिवस, जन्मसाल, मोबाईल नंबर इत्यादी.
- कधीही एकच पासवर्ड सर्व अकाऊंटसाठी वापरु नका, बँकिंग पासवर्ड किंवा ट्रेडिंग अकाऊंचा पासवर्ड बनवण्यासाठी विविध नंबरचा उपयोग करा
- आपला पासवर्ड ठराविक काळाने बदलत राहा