Elon Musk तयार करणार Smartphone? एका धमकीनं उडवली Apple आणि Google ची झोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 08:23 AM2022-11-28T08:23:39+5:302022-11-28T08:25:24+5:30

Elon Musk यांच्या ट्विटने उडाली खळबळ...

Twitter's new chief elon musk make his own smartphone if apple and google ban twitter | Elon Musk तयार करणार Smartphone? एका धमकीनं उडवली Apple आणि Google ची झोप!

Elon Musk तयार करणार Smartphone? एका धमकीनं उडवली Apple आणि Google ची झोप!

Next

ही बातमी वाचून आपणही म्हणाल, की Twiiter चे नवे बॉस इलॉन मस्क काहीही करू शकता. इलॉन मस्क यांनी स्मार्टफोन क्षेत्रातील अ‍ॅपल आणि गुगल या दिग्गज कंपन्यांना थेट इशारा दिला आहे. या दोन्ही कंपन्यांनी ट्विटरवर बंदी घातल्यास, आपण स्वतःचा स्मार्टफोन तयार करू, असे मस्क यांनी म्हटले आहे. अर्थात या कंपन्यांनी आपल्या प्ले स्टोअरवरून ट्विटर अ‍ॅप बॅन केल्यास, मस्क असा निर्णय घेऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, कंटेंट मॉडरेशन इश्यूच्या मुद्द्यावर Apple आणि Google अ‍ॅप स्टोरवर ट्विटर बॅन केले जाऊ शकते.

Elon Musk यांच्या ट्विटने उडाली खळबळ -
यासंदर्भात एका युजरने विचारलेल्या प्रश्नला उत्तर देताना मस्क यांनी हे विधान केले आहे. जर गूगल अथवा अ‍ॅप्पलने आपल्या अ‍ॅप स्टोअरवरून ट्विटर बॅन केले, तर मस्क बाजारात नवा फोन आणणार का? असा प्रश्न या युजरने विचारला होता. यावर मस्क म्हणाले, आपण खरो खरच नवा फोन बाजारात आणू. 'मला आशा आहे, की असे होणार नाही. मात्र, हो, जर असे झालेच, तर मी फोन तयार करेन,' असे मस्क यांनी म्हटले आहे. मस्क यांच्या या उत्तरावर, Nothing चे फाउंडर Carl Pei यांनी रिअॅक्शन दिली आहे. आता पुढे मस्क काय करतात हे पाहण्यासाठी आपण उत्सुक आहोत.

Apple आणि Google ट्विटर बॅन करू शकतात का? तर याचे उत्तर हो असेल आहे. इलॉन मस्क यांची कंपनी असलेल्या ट्विटरने Apple आणि Google च्या दिशानिर्देशांचे पालन केले नाही, तर अ‍ॅप स्टोरवरून ट्विटर बॅन केले जाऊ शकते. महत्वाचे म्हणजे, इलॉन मस्क ट्विटर सब्सक्रिप्शन प्लॅन लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. ते यूजर्स ना 8 डॉलर चार्ज करण्याची योजना तयार करत आहेत. यामुळे ट्विटरचा रेव्हेन्यू वाढेल. एवढेच नाही, तर ट्विटरच्या पेड सब्सक्रिप्शन प्लॅनचा Apple आणि Google लाही फायदा होईल.

 Apple आणि Google हे आपल्या प्लॅटफॉर्मवरून खरेदी केल्या गेलेल्या सब्सक्रिप्शनवर कमीशन घेतात. हे दोघेही डेव्हलपर्सकडून 15 टक्के घेतात. ही किंमत 30 टक्क्यांवरून आता 15 टक्के करण्यात आली आहे. खरे तर, Apple आणि Google अशा प्रकारे चार्ज करत असल्यावरून इलॉन मस्क यांनी नेहमीच त्यांच्यावर टीका केली आहे. जर मस्क यांनी Apple आणि Google च्या पेमेंट स्ट्रक्चरकडे दूर्लक्ष केले, तर  अ‍ॅप स्टोअरवर ट्विट बॅन केले जाऊ शकते, असा दावा टेक अ‍ॅनालिस्ट मार्क गुरमन यांनी केला आहे.

Web Title: Twitter's new chief elon musk make his own smartphone if apple and google ban twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.