ट्विटरचा नवा लोगो अनेकांच्या डोळ्यात खुपला! मुख्यालयावरून हटविला, मस्क यांच्या हट्टापायी इमारत मालक फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 11:39 AM2023-08-01T11:39:25+5:302023-08-01T11:39:39+5:30

ट्विटर मोठ्या प्रमाणावर एक्स लोगोचे ब्रँडिंग करत आहे. यासाठी कंपनीच्या हेडक्वार्टरवर व्हाईट एलईडी लाईटचा लोगो लावण्यात आला होता.

Twitter's new logo caught the eye of many! Removed from headquarters, building owner fined on Musk's whims | ट्विटरचा नवा लोगो अनेकांच्या डोळ्यात खुपला! मुख्यालयावरून हटविला, मस्क यांच्या हट्टापायी इमारत मालक फसला

ट्विटरचा नवा लोगो अनेकांच्या डोळ्यात खुपला! मुख्यालयावरून हटविला, मस्क यांच्या हट्टापायी इमारत मालक फसला

googlenewsNext

एलन मस्क यांचा एक्स हा ट्विटरचा लोगो अनेकांना पहावलेला नाहीय. गेल्या आठवड्यात मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलून एक्स केला होता. यानंतर कंपनीने मुख्यालयावर एक्स लोगो लावला होता. परंतू, हा लोगो अनेकांच्या डोळ्यात खुपला आहे. यामुळे तो काढावा लागला आहे. 

ट्विटर मोठ्या प्रमाणावर एक्स लोगोचे ब्रँडिंग करत आहे. यासाठी कंपनीच्या हेडक्वार्टरवर व्हाईट एलईडी लाईटचा लोगो लावण्यात आला होता. सॅन फ्रान्सिस्को येथील या मुख्यालयाच्या इमारतीवरील लोगोची लाईट अनेकांना त्रासदायक ठरल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आजुबाजुला राहणाऱ्या लोकांना या लोगोच्या लायटिंगमुळे त्रास होत आहे. रात्रीच्यावेळी या लोगोचा प्रकाश अधिक त्रासदायक असल्याची तक्रार या लोकांनी प्रशासनाकडे केली आहे. तक्रारीनंतर निरीक्षकांनी इमारतीच्या छतावर जाण्याचा प्रयत्न केला. परंतू, ट्विटरने त्यांना रोखले. हा लोगो इव्हेंटनुसार लावण्यात आला आहे आणि तो तात्पुरता आहे, असे सांगण्यात आले. 

सॅन फ्रान्सिस्को डिपार्टमेंट ऑफ बिल्डिंग इन्स्पेक्शन आणि सिटी प्लॅनिंगचे कम्युनिकेशन डायरेक्टर पॅट्रिक हॅनन यांनी सांगितले की, या इमारतीला नोटीस जारी करण्यात आली आहे. आठवडाभरात सुमारे २४ तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. आम्ही हा लोगो काढून टाकणार आहोत. तसेच इमारत मालकालाही दंड करण्यात आला आहे. 

मस्क यांनी इमारतीवर नवीन लोगो सेटअप केल्यानंतर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता. ट्विटरचा लोगो एरियल व्ह्यूमध्ये दाखवण्यात आला होता. रात्रीच्या वेळी तो खूप जास्त प्रकाश फेकत होता. 

Web Title: Twitter's new logo caught the eye of many! Removed from headquarters, building owner fined on Musk's whims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.