तासभर ट्विटरचा सर्व्हर डाऊन; युजर ट्विट टाकून टाकून थकले
By हेमंत बावकर | Published: October 28, 2020 09:56 PM2020-10-28T21:56:19+5:302020-10-28T21:56:31+5:30
Twitter down मोबाईल, कॉम्प्युटर आदींवर ट्विटर ओपन करण्यात समस्या जाणवत होती. रिफ्रेश केल्यास एरर दाखविला जात होता.
भारतामध्ये बुधवारी रात्री 8 च्या सुमारास ट्विटर ठप्प झाले होते. सर्व्हर डाऊन झाल्याने वेब आणि मोबाईल अॅप दोन्ही ठिकाणी ट्विट पोस्ट करता येत नव्हते. जवळपास तासभर ही समस्या असल्याने नेटकरी त्रस्त झाले होते.
मोबाईल, कॉम्प्युटर आदींवर ट्विटर ओपन करण्यात समस्या जाणवत होती. रिफ्रेश केल्यास एरर दाखविला जात होता. ही समस्या भारतातच नव्हती तर, मलेशिया आणि इंडोनेशियासह अन्य आशियाई देशांमध्ये युजर त्रस्त झाले होते. या युजरनी DownDetector नावाच्या वेबसाईटवर जाऊन तक्रार दाखल केली आहे. मात्र, या गोंधळावर ट्विटरने अद्याप काही माहिती दिलेली नाही. सुमारे तासाभराने ट्विटर पुन्हा सुरु झाले.
ट्विटर बंद पडल्याने त्यावरील मिम्स लगेचच व्हायरल होऊ लागले. मात्र, ते ट्विटरची प्रतिस्पर्धी फेसबुकवर. याआधीही अनेकदा ट्विटर असेच काहीवेळासाठी बंद पडले आहे. यामुळे युजर त्यांचा राग फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्सअॅपवर व्यक्त करत होते.