वनप्लस 7 ला टक्कर देण्यासाठी Redmi आणि ASUS चे दोन फोन येतायत...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 02:11 PM2019-05-16T14:11:18+5:302019-05-16T14:11:58+5:30
वनप्लसने दोन दिवसांपूर्वीच 48 मेगापिक्सलचा स्मार्टफोन लाँच केला खरा पण त्याची किंमत पन्नास हजारावर गेल्याने सामान्यांच्या आवाक्यात असलेला ब्रँड रेडमीने वनप्लसच्या ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी कंबर कसली आहे.
शाओमीच्या रेडमी ब्रँडने 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन वनप्लसच्या आधीच लाँच केला होता. मात्र, अनेकांना वनप्लसची उत्सुकता होती. वनप्लसने दोन दिवसांपूर्वीच 48 मेगापिक्सलचा स्मार्टफोन लाँच केला खरा पण त्याची किंमत पन्नास हजारावर गेल्याने सामान्यांच्या आवाक्यात असलेला ब्रँड रेडमीने वनप्लसच्या ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी कंबर कसली आहे. रेडमी आणखी एक 48 मेगापिक्सलचा फोन लाँच करणार आहे. तर असूस झेनफोनचाही 48 मेगापिक्सलचा फोन आज लाँच होणार आहे.
Zenfone 6 मध्ये एकापेक्षा जास्त व्हेरिएन्टस आहेत. टॉपच्या व्हेरिअंटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. याफोनमध्येही Sony IMX586 सेन्सर असणार आहे. तसेच 5000 एमएएच बॅटरी असेल. फुल एचडी प्लस डिस्प्ले, Android 9.0 Pie असणार आहे. तसेच 128 जीबीपासून 512 जीबी स्टोरेज स्पेस असणार आहे.
5000 > 1+7+3700, so why choose ordinary when you can #DefyOrdinary? #ZenFone6pic.twitter.com/x8R24953mS
— ASUS (@ASUS) May 14, 2019
सोशल मीडियावर दोघांनीही वनप्लसला खिजविले आहे. Redmi Note 7 मध्ये आणखी एका फोनची एन्ट्री होणार आहे. अधिकृत ट्विटर हँडलवर शाओमीने ही माहिती दिली आहे. Redmi Note 7S असे या फोनचे नाव असेल.
रेडमीने या फोनला 48MP कॅमेराच्या फोनने टॅग केले आहे. हा फोन 20 मे रोजी लाँच केला जाणार आहे.
This is the #RedmiNote you've been waiting for! 👀#RedmiNote7S with a Super #48MP camera is coming on 20th May!
— Redmi India (@RedmiIndia) May 16, 2019
Know more: https://t.co/KMvcxG1eHb#48MPForEveryonepic.twitter.com/G5YQt2mO6h
Redmi Note 7S ला काही दिवसांतच बाजारात येणार असला तरीही त्याची रॅम, प्रोसेसर आणि डिझाईनबाबत अद्याप माहिती नाही.