TWS Earbuds: Sony चे सर्वात स्वस्त इयरबड्स; पाण्यात भिजल्यावरही देणार दमदार साऊंड आणि 20 तासांचा म्युजिक टाइम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 03:53 PM2022-01-11T15:53:36+5:302022-01-11T15:54:45+5:30
TWS Earbuds: देशात आलेले Sony WF-C500 कंपनीचे सर्वात स्वस्त इयरबड्स आहेत. हे इयरबड्स सिंगल चार्जवर 20 तासांपर्यंतचा बॅटरी लाईफ देतात.
Sony आपल्या टीव्ही, कॅमेरा आणि ऑडिओ प्रोडक्ट्ससाठी ओळखली जाते. कंपनीनं आता भारतात आपले नवीन TWS Earbuds सादरे केले आहेत. देशात आलेले Sony WF-C500 कंपनीचे सर्वात स्वस्त इयरबड्स आहेत. हे इयरबड्स सिंगल चार्जवर 20 तासांपर्यंतचा बॅटरी लाईफ देतात.
Sony WF-C500 ची किंमत 5,990 रुपये ठेवण्यात आली आहे. तुमची हे बड्स ब्लॅक, ग्रीन, ऑरेंज आणि व्हाईट रंगात विकत घेतु शकता. परंतु यासाठी तुम्हाला 16 जानेवारीची वाट बघावी लागेल. सोनी सेंटर, सोनी एक्सक्लूसिव स्टोर सह प्रमुख ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरून यांची विक्री केली जाईल.
Sony WF-C500 चे स्पेसिफिकेशन
या नव्या सोनी इयरबड्समध्ये 5.8mm च्या ड्रायव्हरचा वापर करण्यात आला आहे जे दमदार साऊंड क्वॉलिटी देतात. यांचा फ्रीक्वेंसी रिस्पॉन्स रेंज 20Hz ते 20,000Hz दरम्यान आहे. कंपनीच्या Digital Sound Enhancement Engine टेक्नॉलजीमुळे चांगली ऑडियो आणि कॉल क्वॉलिटी मिळते. तसेच IPX4 रेटिंग म्हणजे यावर उडणाऱ्या पाण्याच्या कोणताही परिणाम होणार नाही.
हे सोनीचे TWS इयरबड्स व्हॉइस असिस्टंट, फास्ट फास्ट पेयर आणि स्विफ्ट पेयर टेक्नॉलजीला सपोर्ट करतात. यातील ब्लूटूथ चिप लॅगविना डावीकडून उजवीकडे साऊंड ट्रांसमिट करते. हे इयरबड्स सिंगल चार्जवर 10 तासांचा बॅटरी लाईफ देतात. तर, चार्जिंग केसमुळे हा बॅटरी बॅकअप 20 पर्यंत वाढतो. घाईत तुम्ही फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये एक तासांचा प्ले-टाइम मिळवू शकतात.
हे देखील वाचा:
28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर
वनप्लसचे फोन फुटत असतानाच नवा 'धमाका'; OnePlus 10 Pro लॉन्च, अफलातून फिचर्स