TWS Earbuds Under 2000: 42 तासांचा प्ले बॅक देणारे Noise Buds Prima इयरबड्स लाँच; किंमत फक्त 1,799 रुपये
By सिद्धेश जाधव | Published: December 10, 2021 07:42 PM2021-12-10T19:42:56+5:302021-12-10T19:43:09+5:30
TWS Earbuds Under 2000: Noise Buds Prima इयरबड्स भारतात लाँच करण्यात आले आहेत. यात क्वॉड मायक्रोफोन, क्विक चार्ज, लो-लेटेंसी मोड असे भन्नाट फीचर्स मिळतात
Noise नं भारतात आपले नवीन बजेट फ्रेंडली TWS Earbuds लाँच केले आहेत. हे बड्स Noise Buds Prima नावानं बाजारात आले आहेत. हे इयरबड्स सिंगल चार्जमध्ये 42 तासांचा प्ले बॅक टाइम देतात, असा दावा कंपनीनं केला आहे. त्याचबरोबर यात क्वॉड मायक्रोफोन, क्विक चार्ज, लो-लेटेंसी मोड असे भन्नाट फीचर्स मिळतात. या ईरबड्सची किंमत मात्र कंपनीनं 2 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे.
Noise Buds Prima ची किंमत आणि उपलब्धता
Noise Buds Prima ची किंमत 2000 रुपयांच्या आत ठेवण्यात आली आहे. हे बड्स 1,799 रुपयांमध्ये विकत घेता येतील. कंपनीनं या इयरबड्सचे ब्लॅक, व्हाइट आणि गोल्ड कलर ऑप्शन सादर केले आहेत. Noise Buds Prima इयरबड्स फ्लिपकार्टवरून 14 डिसेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून खरेदी करता येतील.
Noise Buds Prima चे स्पेसिफिकेशन्स
Noise Buds Prima मध्ये इन-ईयर स्टाइल डिजाइन देण्यात आली आहे. बॉक्समध्ये इंटरचेंजेबल ईयरटिप्स देखील मिळतात. या बड्समध्ये कंपनीनं 6mmच्या ड्रायव्हर्सचा वापर केला आहे, जे चांगली म्युजिक क्वॉलिटी मिळवून देतात. तसेच यात क्वॉड माइक सेटअप मिळतो, त्यामुळे कॉलवर चांगली ऑडियो क्वॉलिटी मिळते.
यातील TWS अल्ट्रा-लो लेटेंसी गेमिंग मोड खास गेमर्ससाठी सादर करण्यात आला आहे. या मोडयामध्ये लेटेंसी 44 मिलीसेकंड पर्यंत कमी होते. हे बड्स सिंगल चार्जमध्ये केससह 42 तासांची बॅटरी लाईफ देतात, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच यातील फास्ट चार्जिंग फक्त 10 मिनिटांच्या चार्जवर 2 तासांचा म्यूजिक प्लेबॅक देऊ शकते. Noise Buds Prima मध्ये हायपरसिंक टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. या टेक्नॉलॉजीमुळे डिवाइस त्वरित कनेक्ट होतात. तसेच यात व्हॉइस असिस्टंट सपोर्ट मिळतो, ज्यात गुगल असिस्टंट आणि सिरीचा समावेश आहे. यातील IPX5 रेटिंग पाण्यापासून बड्सच संरक्षण करते.