फक्त 500 रुपयांमध्ये आला 15 तास चालणारा Bluetooth Neckband; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 07:40 PM2021-12-28T19:40:07+5:302021-12-28T19:40:49+5:30

U&i Prime Shuffle 3 ब्लूटूथ नेकबँड इयरफोन्स भारतात लाँच झाले आहेत. खूपच कमी किंमतीत येणारे हे इयरफोन्स 15 तासांपेक्षा जास्त बॅटरी बॅकअप देतात.  

U&I prime shuffle 3 neckband launched in india with fast charging price rs499  | फक्त 500 रुपयांमध्ये आला 15 तास चालणारा Bluetooth Neckband; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

फक्त 500 रुपयांमध्ये आला 15 तास चालणारा Bluetooth Neckband; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Next

ऑडियो ब्रँड यू अँड आय नं भारतात U&i Prime Shuffle 3 हे ब्लूटूथ नेकबँड इयरफोन्स सादर केले आहेत. या इयरफोन्सची किंमत खूप कमी आहे. परंतु कंपनीनं फीचर्स आणि स्पेक्स दमदार दिले आहेत. तसेच या इयरफोन्सची डिजाईन देखील उठून दिसते. चला जाणून घेऊया U&i Prime Shuffle 3 ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.  

यात सोप्पे कंट्रोल, सुपर फास्ट चार्जिंग , असे फिचर मिळतात. या ईयरफोनमध्ये 150 एमएएचची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जमध्ये 15 तासांचा बॅकअप देते. या इयरफोन्समध्ये ब्लूटूथ 5.0 ची कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. हे स्मार्टफोन किंवा इतर ब्लूटूथ डिवाइसची 10 मीटरच्या रेंजपर्यंत कनेक्टेड राहू शकतात. तसेच यासोबत एकसाठी दोन डिवाइस कनेक्ट करता येतात. तसेच यातील फास्ट चार्जिंग फिचर काही मिनिटांत इयरफोन्स रेडी करतो.  

किंमत  

यू अँड आई प्राईम शफल 3 ईयरफोनची किंमत 2,699 रुपये आहे, परंतु सध्या हे ईयरफोन फक्त 499 रुपयांमध्ये विकत घेता येतील. कंपनीनं हे इयरफोन्स अधिकृत वेबसाईटसह, अ‍ॅमेझॉन आणि इतर ऑनलाईन स्टोर्सवर उपलब्ध केले आहेत. हे ईयरफोन ब्लॅक, रेड आणि ब्लू कलर विकत घेता येतील.  

हे देखील वाचा:   

लै भारी! 35 हजारांच्या डिस्काउंटसह स्मार्टफोन घेण्याची शेवटची संधी, पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर

Samsung युजर्स सावधान! अधिकृत अ‍ॅप स्टोरच करतंय धोकादायक अ‍ॅप्सचा प्रसार; अशाप्रकारे सुरक्षित ठेवा स्मार्टफोन

Web Title: U&I prime shuffle 3 neckband launched in india with fast charging price rs499 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.