सायबर अटॅक! हॅकर्सनी १९ रेल्वे स्टेशनच्या Wi-Fi नेटवर्कला केलं टार्गेट; करू नका 'ही' चूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:40 IST2024-09-27T15:37:48+5:302024-09-27T15:40:57+5:30
१९ रेल्वे स्टेशनवरील सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क हॅक करण्यात आलं.

सायबर अटॅक! हॅकर्सनी १९ रेल्वे स्टेशनच्या Wi-Fi नेटवर्कला केलं टार्गेट; करू नका 'ही' चूक
ब्रिटनमध्ये एक मोठा सायबर अटॅक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ रेल्वे स्टेशनवरील सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क हॅक करण्यात आलं. बुधवारी हे नेटवर्क हॅक झालं, त्याचा प्रभाव गुरुवारीही पाहायला मिळाला. आतापर्यंत हे नेटवर्क रिकव्हर करण्यात आलेलं नाही. ब्रिटीश ट्रान्सपोर्ट पोलीस (BTP) सायबर अटॅकचा तपास करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लंडन, मँचेस्टर आणि बर्मिंगहॅमसह यूकेमधील १९ रेल्वे स्टेशनचे सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क हॅक करण्यात आलं होतं. प्रवाशांनी सार्वजनिक वाय-फाय वापरण्यासाठी लॉग इन करताच, त्यांना दहशतवादी हल्ल्यांबाबत मेसेज मिळाला. मेसेजमध्ये अजब सिक्योरिटी वॉर्निंग आणि संशयास्पद पॉप-अप दिसू लागले, ज्यामुळे प्रवासी घाबरले. अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच वाय-फाय नेटवर्क बंद करून प्रकरणाचा तपास सुरू केला.
वाय-फाय प्रणाली व्यवस्थापित करण्यासाठी जबाबदार असलेल्या टॅलेंट कंपनीने सांगितलं की, बुधवारी संध्याकाळी हे झालं. BTP ने पुष्टी केली की ते या प्रकरणाचा सक्रियपणे तपास करत आहेत. आम्हाला बुधवारी संध्याकाळी ५.०३ वाजता नेटवर्क रेल वाय-फाय सेवांवर इस्लामोफोबिक मेसेज प्रदर्शित करणाऱ्या सायबर हल्ल्याचा रिपोर्ट मिळाला आहे.
अशा प्रकारे सुरक्षित ठेवा वाय-फाय
सायबर तज्ज्ञांच्या मते, सार्वजनिक वाय-फाय सुरक्षित नाही कारण कोणीही तिथल्या नेटवर्कवर सहज प्रवेश करू शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही सार्वजनिक वाय-फाय वापरत असाल, तर अशी कोणतीही वेबसाइट उघडू नका जिथून तुमची वैयक्तिक माहिती लीक होऊ शकते.