जबरदस्त! या स्मार्टफोनवर टिकणार नाही बॅक्टेरिया; अँटी-बॅक्टेरियल कोटिंगसह Ulefone Armor 12 Dual 5G लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: August 16, 2021 06:47 PM2021-08-16T18:47:22+5:302021-08-16T18:53:45+5:30

Ulefone Armor 12 Dual 5G: Ulefone Armor 12 Dual 5G स्मार्टफोन कंपंनीने मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसरसह सादर केला आहे.  

Ulefone armor 12 dual 5g launched with antibacterial coating and dimencity 700 soc  | जबरदस्त! या स्मार्टफोनवर टिकणार नाही बॅक्टेरिया; अँटी-बॅक्टेरियल कोटिंगसह Ulefone Armor 12 Dual 5G लाँच 

जबरदस्त! या स्मार्टफोनवर टिकणार नाही बॅक्टेरिया; अँटी-बॅक्टेरियल कोटिंगसह Ulefone Armor 12 Dual 5G लाँच 

Next
ठळक मुद्देफोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो.तील हाय-एन्ड स्पिकर 106dB पर्यंत लाऊड आवाज प्रक्षेपित करू शकतात. Ulefone Armor 12 Dual 5G स्मार्टफोन AliExpressच्या माध्यमातून विकत घेता येईल.

Ulefone कंपनी आपले हटके आणि रगेड स्मार्टफोन्स सादर करण्यासाठी ओळखली जाते. आता कंपनीने Ulefone Armor 12 Dual 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे हा फोन अँटी-बॅक्टेरियल कोटिंगसह सादर करण्यात आला आहे. तसेच हा फोन ड्युअल 5जी हायपरफास्ट नेटवर्क आणि Dual-HiFi स्पिकरला सपोर्ट करतो. Ulefone Armor 12 Dual 5G स्मार्टफोन AliExpressच्या माध्यमातून विकत घेता येईल. फोनची प्री-बुकिंग 23 ऑगस्टपासून सुरु होईल.  

Ulefone Armor 12 Dual 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Ulefone Armor 12 Dual 5G मध्ये कंपनीने 6.52 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. हा एक वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. वर सांगितल्याप्रमाणे या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर चालतो. या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, वायफाय आणि एनएफसी देण्यात आली आहे. यातील हाय-एन्ड स्पिकर 106dB पर्यंत लाऊड आवाज प्रक्षेपित करू शकतात. तसेच यावरील अँटी-बॅक्टेरियल कोटिंग सूक्ष्म जंतूंना या फोनवर टिकून देत नाही.  

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलची वाईड-अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Ulefone Armor 12 Dual 5G मधील 5180mAh ची बॅटरी 18 वॉट वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15 वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: Ulefone armor 12 dual 5g launched with antibacterial coating and dimencity 700 soc 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.