याला म्हणतात मजबूत फोन! उंचावरून पडल्यावर आणि पाण्यात बुडल्यावर देखील राहणार सुरक्षित हा स्वस्त स्मार्टफोन  

By सिद्धेश जाधव | Published: September 24, 2021 12:18 PM2021-09-24T12:18:11+5:302021-09-24T12:22:38+5:30

Rugged Phone Armor X8i Price In India: Armor X8i रगेड स्मार्टफोनची किंमत 145.99 डॉलर आहे. हा फोन कंपनीच्या वेबसाईटवरून जगभरात कुठूनही विकत घेता येईल.

Ulefone armor x8i rugged phonegoes official with 5080 mah battery price sale  | याला म्हणतात मजबूत फोन! उंचावरून पडल्यावर आणि पाण्यात बुडल्यावर देखील राहणार सुरक्षित हा स्वस्त स्मार्टफोन  

याला म्हणतात मजबूत फोन! उंचावरून पडल्यावर आणि पाण्यात बुडल्यावर देखील राहणार सुरक्षित हा स्वस्त स्मार्टफोन  

Next
ठळक मुद्देहा फोन कंपनीच्या वेबसाईटवरून जगभरात कुठूनही विकत घेता येईल. Armor X8i रगेड स्मार्टफोनची किंमत 145.99 डॉलर आहे.

Rugged (रगेड) स्मार्टफोनच्या कॅटेगरीमध्ये मजबूत फोन्स सादर केले जातात. असे स्मार्टफोन सादर करण्यासाठी Ulefone ही कंपनी प्रसिद्ध आहे. आता या कंपनीने आपला नवीन दणकट स्मार्टफोन सादर केला आहे, ज्याचे नाव Armor X8i असे ठेवण्यात आले आहे. नवीन आर्मर एक्स सीरीजमध्ये आलेला हा फोन मजबूत तर आहेच, त्याचबरोबर यात वॉटर रेजिस्टन्स देखील देण्यात आले आहे.  

Armor X8i ची किंमत 

Armor X8i रगेड स्मार्टफोनची किंमत 145.99 डॉलर आहे. ही किंमत सुमारे 11 हजार भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन कंपनीच्या वेबसाईटवरून जगभरात कुठूनही विकत घेता येईल. कंपनीने फोनचे दोन कलर व्हेरिएंट सादर केले आहेत. ज्यात ऑरेंज आणि ब्लॅकचा समावेश आहे.  

Ulefone Armor X8i चे स्पेसिफिकेशन्स 

Armor X8i मध्ये 5.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसींगसाठी या फोनमध्ये MT6762 ऑक्टा-कोर चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256GB पर्यंत वाढवता येईल. या फोनमधील ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलच्या मेन सेन्सरसह दोन 2 मेगापिक्सलचे सेन्सर देण्यात आले आहेत. तसेच, फ्रंटला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 

Armor X8i हा एक Android 11 वर चालणार मोबाईल आहे. सिक्योरिटीसाठी हा डिवाइस फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर अशी ड्युअल सिक्योरिटी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटी ऑप्शन म्हणून यात NFC, क्वॉड नेविगेशन सिस्टम आणि 4G VoLTE मिळेल. या फोनमध्ये भारतीय भाषांपैकी हिंदी भाषेचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हा फोन IP68/69K सुरक्षा ग्रेडसह सादर करण्यात आला आहे. म्हणजे हा फोन पाणी, धुळीपासून सहज सुरक्षित राहू शकतो. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5080एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

Web Title: Ulefone armor x8i rugged phonegoes official with 5080 mah battery price sale 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.