Budget Phone: परवडणाऱ्या किंमतीत 5180mAh बॅटरीसह Ulefone Note 13P लाँच; जाणून घ्या किंमत
By सिद्धेश जाधव | Published: November 23, 2021 05:12 PM2021-11-23T17:12:10+5:302021-11-23T17:12:18+5:30
Budget Phone: कोणताही गाजावाजा न करता कंपनीने Ulefone Note 13P ग्लोबली लाँच केला आहे. हा फोन Android 11, मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आला आहे.
Ulefone Note 13P स्मार्टफोन कंपनीने कोणताही गाजावाजा न करता ग्लोबली सादर केला आहे. या बजेट फोनमध्ये Mediatek Helio G35 प्रोसेसर, 4GB RAM, 20MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 5180mAh ची बॅटरी असे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन याआधी आलेल्या Ulefone Note 12P ची जागा घेईल.
Ulefone Note 13P चे स्पेसिफिकेशन्स
Ulefone Note 13P मध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसरची ताकद कंपनीने दिली आहे. त्याचबरोबर 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते. हा फोन Android 11 वर चालतो. कनेक्टिविटीसाठी या ड्युअल सिम फोनमध्ये 4जी, एनएफसी, वाय-फाय, ब्लूटूथ इत्यादी ऑप्शन मिळतात.
Ulefone Note 13P मध्ये पॉवर बॅकअपसाठी 5180mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 10Wफास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साईड माउंटेन्ड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाचा Full-HD+(1800 x 2400 पिक्सल) IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी Ulefone Note 13P मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये 20 मेगापिक्सल Sony IMX350 सेन्सरने प्रायमरी कॅमेऱ्याची जागा घेतली आहे. तर त्याच्या जोडीला कंपनीने 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा दिला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा Sony IMX481 सेन्सर फ्रंट कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे.
Ulefone Note 13P ची किंमत
Ulefone Note 13P फोनची किंमत 170 अमेरिकन डॉलर्स (सुमारे 12,650 रुपये) आहे. हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह विकत घेता येईल. तसेच हा डिवाइस स्टारी ब्लॅक आणि मिस्टरी ब्लू अशा दोन रंगात Ulefone च्या अधिकृत वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.