फक्त 13 हजार रुपयांचा शानदार स्मार्टफोन, फुल चार्जमध्ये 22 दिवस चालणार; जाणून घ्या फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 02:11 PM2022-10-03T14:11:51+5:302022-10-03T14:12:28+5:30
Ulefone Power Armor 16 Pro च्या मागील बाजूस एक सुपर लाऊड स्पीकर आहे.
नवी दिल्ली : Ulefone आपले लेटेस्ट पॉवर आर्मर 16 प्रो (Power Armor 16 Pro)ला ग्लोबली AliExpress वर लाँच करण्यासाठी सज्ज आहे. हा स्मार्टफोन केवळ वर्ल्ड प्रीमियर सेल अंतर्गत 159.99 डॉलरच्या (अंदाजे 13 हजार रुपये) सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, या स्मार्टफोनची विक्री 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 13 ऑक्टोबर 2022 रोजी संपणार आहे. याचबरोबर, पहिल्या 50 खरेदीदारांसाठी Ulefone स्मार्टफोनसह Ulefone Buds ची मोफत जोडी देत आहे. हे लेटेस्ट ईअरबड आहेत, जे त्याचवेळी जारी करण्यात आले. जेव्हा Ulefone च्या अधिकृत वेबसाइटवर रग्ड मॉडेल, Power Armor 16 Pro रिलीज झाला आहे.
Ulefone Power Armor 16 Pro Specifications
Ulefone Power Armor 16 Pro च्या मागील बाजूस एक सुपर लाऊड स्पीकर आहे. स्पीकरचा डायरमीटर 36 मिमीपर्यंत पोहोचतो आणि त्याची कमाल आवाज 122 डीबी आहे, जी जेबीएल चार्ज 5 सारख्या पारंपारिक ब्लूटूथ स्पीकरपेक्षा जास्त आहे. हे मल्टीफंक्शनल प्रोटेक्टिव केस आणि डेस्क चार्जिंग डॉक सारख्या अॅक्सेसरीजसह येते आणि विस्तारित डिव्हाइस किंवा कनेक्ट करण्यासाठी USmart एक्सपेंशन कनेक्टरटी सुविधा आहे.
Ulefone Power Armor 16 Pro Battery & Camera
स्मार्टफोन 9600mAh बॅटरी आहे, जी तुम्हाला 528 तासांपर्यंत स्टँडबाय देते. हे MediaTek Helio G25 चिपसेटद्वारे संचालिच आहे आणि 4GB RAM + 64GB इंटरनल स्टोरेजसह येते. इतर फीचर्समध्ये 16MP ड्युअल रियर कॅमेरा, एक ब्राइटनेस फ्लॅशलाइट, मोठा 5.93-इंचाचा डिस्प्ले, Android 12 OS, NFC, Google Pay इत्यादींचा समावेश आहे.
Ulefone Buds
Ulefone TWS इअरबड्सचे वजन फक्त 3.6 किलोग्रॅम आहे, जे त्यांना अत्यंत हलके बनवते. तुम्हाला एका चार्जवर 5 तासांचा प्लेबॅक वेळ आणि चार्जिंग केससह 20 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी, तुमच्याकडे ब्लूटूथ v5.1 आहे, जे 10 मीटरच्या आत संतुलित आणि अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करते. इयरबड मोबाइल फोन, टॅब्लेट, आयपॅड आणि संगणकांशी सुसंगत आहे आणि एचडी साउंड क्वालिटी आहे. बड्स सिंगल इअरबड ऑडिओला देखील सपोर्ट करते, ज्यामुळे ते मल्टीटास्किंगसाठी परफेक्ट असल्याचे दिसून येते.