चुकीच्या UPI आयडीवर पैसे पाठवले? काळजी करू नका; असे परत मिळवा तुमच्या हक्काचे पैसे...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 02:47 PM2023-02-24T14:47:40+5:302023-02-24T14:52:45+5:30

अनेकदा चुकीच्या आयडीवर पैसे पाठवले जातात, अशावेळी घाबरण्याची गरज नाही. या स्टेप फॉलो करुन पैसे परत मिळवा.

Unified Payments Interface, Sent payment to wrong UPI ID? Don't worry; Get your rightful money back like this | चुकीच्या UPI आयडीवर पैसे पाठवले? काळजी करू नका; असे परत मिळवा तुमच्या हक्काचे पैसे...

चुकीच्या UPI आयडीवर पैसे पाठवले? काळजी करू नका; असे परत मिळवा तुमच्या हक्काचे पैसे...

googlenewsNext

गेल्या काही वर्षात Unified Payments Interface म्हणजेच UPI ने पेमेंटच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. लोक आता UPI द्वारे कोणालाही सहजपणे पेमेंट करू शकतात आणि पेमेंट मिळवू शकतात. पण अनेकदा घाई घाईत चुकून दुसऱ्या कुठल्यातरी आयडीमध्ये पेमेंट केले जाते. पण, दुसऱ्याला गेलेले पेमेंट परत मिळवता येते. आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत.

अॅप सपोर्टशी संपर्क साधा
आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, युजरने सगळ्यात पहिले पेमेंट सर्व्हिस प्रोवायडरशी संपर्क साधावा. तुम्हाला GPay, PhonePe, PayTM इत्यादी पेमेंट प्रोवायडरच्या केअर सपोर्टवर कॉल करुन घडलेला प्रकार सांगावा लागेल. तुम्ही येथे समस्या फ्लॅग करू शकता आणि पैसे परत करण्याची विनंती करू शकता.

इथे करा तक्रार 
जर युजरला कस्टमर केअरकडून कोणतीही मदत मिळाली नाही, तर तो NPCI पोर्टलवर तक्रार करू शकतो. तक्रार कशी करायची ते पाहा...

  • सर्व प्रथम NPCI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर What we do या टॅबवर.
  • त्यानंतर UPI वर क्लिक करा.
  • येथे Dispute Redressal Mechanism चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला व्यवहार तपशील प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.
  • तपशील प्रविष्ट केल्यानंतर, जेथे कारण विचारले जाईल, तिथे चुकीच्या पद्धतीने दुसर्या खात्यात हस्तांतरित, हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तक्रार दाखल केली जाईल.

बँकेशी संपर्क साधा
यानंतरही कोणताही तोडगा निघाला नाही, तर तुम्ही तुमची तक्रार पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर बँक आणि ज्या बँकेत पैसे पाठवले आहेत त्या बँकेकडे करू शकता.

Web Title: Unified Payments Interface, Sent payment to wrong UPI ID? Don't worry; Get your rightful money back like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.