मोबाईल ग्राहकांसाठी गुड न्यूज; Union Budget 2022 मध्ये भारत सरकारची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 02:18 PM2022-02-01T14:18:03+5:302022-02-01T14:18:25+5:30
Union Budget 2022: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून आपला चौथा 2022 चा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून आपला चौथा 2022 चा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 2023 मध्ये भारतात 5G सेवा सुरु होणार आहे. तसेच भारतात लवकरच ई-पासपोर्ट सुविधा देण्यात येईल. परंतु यात एक दिलासा देणारी बातमी म्हणजे स्मार्टफोन्ससह काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स स्वस्त होणार आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोबाईल निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांवरचं शुल्क कमी करणार असल्याची घोषणा केली आहे. याचा परिणाम मोबाईल्सच्या किंमतींवर होईल. तसेच मोबाईल्ससह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार आहेत. भारत सरकार मोबाईल फोन्सवर ड्यूटी कन्सेशन देणार आहे. म्हणजे मोबाईल निर्मात्या कंपन्यांना कमी कर भरावा लागेल. परिणामी मोबाईल फोन्स व स्मार्टफोन्ससह मोबाईल अॅक्सेसरीजच्या किंमती देखील कमी होतील.
भारत सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशात निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना होईल. कारण ड्यूटी कन्सेशन मोबाईल फोन्सच्या इम्पोर्टवर नव्हे तर मोबाईल फोन्सच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या स्पेयर पार्ट्सवर देण्यात येईल. म्हणजे ज्या बाहेरच्या देशातून पार्टस मागवून देशात स्मार्टफोन्स व मोबाईल असेम्बल करतात त्यांना आता हे पार्ट कमी किंमतीत आयात करता येतील.
या सवलतीमध्ये मोबाईल पार्ट्स, ट्रान्सफॉर्मर्स, कॅमेरा लेन्स, वियरेबल्स आणि हियरिंग डिवायसेजचा देखील समावेश आहे. देशातील निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून भारतात पार्टस आयत करून मोबाईल्स आणि अन्य डिवाइसेस बनण्याची संख्या वाढेल. तसेच या सवलतीमुळे त्यांची किंमत देखील कमी होईल.
हे देखील वाचा:
- 32 हजारांचा Google Pixel 4a फक्त 1,000 रुपयांत करा खरेदी; शानदार फोटोग्राफी सोबत घ्या स्टॉक अँड्रॉइडचा अनुभव
- Lokmat Tech Tips: अनेक वर्ष वापरून देखील नव्या सारखा राहील तुमचा स्मार्टफोन; फक्त या 5 गोष्टींची काळजी घ्या