हजारो मोबाईलमध्ये आलाय नवा व्हायरस; वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 01:54 PM2019-10-30T13:54:52+5:302019-10-30T14:04:11+5:30

सोशल मीडियावर अनेकजण अ‍ॅक्टिव्ह असतात. मात्र हल्ली युजर्सच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे.

unremovable xhelper malware infected 45000 android devices | हजारो मोबाईलमध्ये आलाय नवा व्हायरस; वेळीच व्हा सावध

हजारो मोबाईलमध्ये आलाय नवा व्हायरस; वेळीच व्हा सावध

Next
ठळक मुद्देXhelper असं या मालवेअरचं नाव असून गेल्या सहा महिन्यांत 45 हजारांहून अधिक अँड्रॉईड डिव्हाईसमध्ये आहे. मालवेअर एकदा डिलिट केल्यानंतरही पुन्हा फोनमध्ये इन्स्टॉल होत आहे. भारत, अमेरिका, रशियामधील युजर्स हे या व्हायरसमुळे त्रस्त झाले आहेत.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर अनेकजण अ‍ॅक्टिव्ह असतात. मात्र हल्ली युजर्सच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी WhatsApp, Facebook आणि गुगलच्या माहितीवर एका नव्या व्हायरसचं सावट असल्याचं समोर आलं होतं. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये Pegasus नावाचा एक व्हायरस आल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता आणखी एक व्हायरस आला आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून शेकडो अँड्रॉईड युजर्स एका नव्या मालवेअरची तक्रार करत आहेत. हा नवा मालवेअर एकदा डिलिट केल्यानंतरही पुन्हा फोनमध्ये इन्स्टॉल होत आहे. तसेच स्मार्टफोन फॅक्ट्री रिसेट केल्यानंतरही तो पुन्हा फोनमध्ये येत असल्याचं युजर्सने म्हटलं आहे. Xhelper असं या मालवेअरचं नाव असून गेल्या सहा महिन्यांत 45 हजारांहून अधिक अँड्रॉईड डिव्हाईसमध्ये आहे. Symantec च्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, Xhelper दररोज जवळपास 131 आणि दर महिन्याला सरासरी 2400 अँड्रॉईड डिव्हाईसमध्ये शिरतो. भारत, अमेरिका, रशियामधील युजर्स हे या व्हायरसमुळे त्रस्त झाले आहेत.

Malwarebytes ने दिलेल्या रिपोर्टनुसार, वेब रिडायरेक्ट हा या मालवेअरचा सोर्स आहे. अँड्रॉईड अ‍ॅप होस्ट करणाऱ्या वेब पेजवर युजर्सना वेब रिडायरेक्टच्या माध्यमातून पाठवलं जातं. प्ले स्टोरच्या बाहेर अनऑफिशियल अँड्रॉईड अ‍ॅप्सना कशा प्रकारे साईड लोड करता येईल हे युजर्सना या वेबसाईट्सच्या माध्यमातून सांगितलं जातं. या अनऑफिशियल अ‍ॅप्समध्ये दडून बसलेला कोड Xhelper ट्रोझन डाउनलोड करतो. अँड्रॉईड डिव्हाईसच्या अ‍ॅप सेक्शनमधून Xhelper अनइन्स्टॉल केलं तरी ते पुन्हा इन्स्टॉल होतं. डिव्हाईस फॅक्ट्री रिसेट केल्यानंतरही ते इन्स्टॉल होतं. गेल्या काही महिन्यांपासून Xhelper अनस्टॉल होत नसल्याची तक्रार Reddit, Google Play Help आणि अन्य सपॉर्ट फोरमवर आहे. 

Pegasus नावाच्या व्हायरसमुळे देखील फोन ट्रॅक करून त्यामध्ये असलेला डेटा सहजपणे चोरीला जाऊ शकतो. Pegasus नावाचा Spyware हा धोकादायक असून ऑथेन्टिकेशन इनवॅलिड झाले तरी युजर्सच्या अकाऊंटला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. हे टूल Android आणि iPhone दोन्हीवर काम करतं. लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोनवरून अपलोड केलेला क्लाऊड डेटा हे टूल अ‍ॅक्सेस करतो. हे टूल स्मार्टफोनमधून हटवलं तरी स्मार्टफोनला याचा धोका असतो. आपली कोणती माहिती अँड्रॉईड अ‍ॅपसोबत सामायिक करायची किंवा नाकारायची हा पर्याय वापरकर्त्यांना उपलब्ध असला तरी हजारो अँड्रॉईड अ‍ॅप परवानगी नसतानाही वापरकर्त्यांचा डेटा परस्पर चोरत असल्याचे समोर आले आहे.

 

Web Title: unremovable xhelper malware infected 45000 android devices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.