पुन्हा मिळणार नाहीत अशी ऑफर! OnePlus च्या 5G फोनवर मिळतेय 15,800 रुपयांची सूट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 16:26 IST2022-05-31T16:26:44+5:302022-05-31T16:26:51+5:30

OnePlus 9 5G स्मार्टफोनवर 15,800 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी सूट दिली जात आहे.  

Up To 15800 Rupees Discount On OnePlus 9 5G   | पुन्हा मिळणार नाहीत अशी ऑफर! OnePlus च्या 5G फोनवर मिळतेय 15,800 रुपयांची सूट  

पुन्हा मिळणार नाहीत अशी ऑफर! OnePlus च्या 5G फोनवर मिळतेय 15,800 रुपयांची सूट  

12GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, 48MP कॅमेरा, 4500mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग असलेला OnePlus 9 खूप स्वस्तात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जर तुम्ही एक फ्लॅगशिप ग्रेड स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या ऑफरचा फायदा घेऊ शकता. यासाठी तुम्हाला थेट डिस्काउंट तर मिळेलच परंतु बँक ऑफरमुळे अधिक सूट देखील मिळेल.  

ऑफर  

OnePlus 9 5G स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटवर 12 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. 49,999 रुपयांमध्ये लाँच झालेले हा फोन आता कंपनीच्या वेबसाईटवरून 37,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच CITI बँकेच्या कार्ड धारकांना 10 टक्के (3799 रुपये) अतिरिक्त डिस्काउंट देखील दिला जात आहे. अशाप्रकारे एकूण 15,800 रुपयांची सवलत मिळेल.  

OnePlus 9 5G चे स्पेसिफिकेशन्स  

OnePlus 9 5G मध्ये कंपनीनं 6.55 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 3D गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह येतो. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि Adreno 660 GPU देण्यात आला आहे. डिवाइस Andriod 11 आधारित वनप्लस ऑक्सीजन ओएस 11 वर चालतो. यात 12GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे.  

OnePlus 9 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या स्मार्टफोनचा मेन कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय यात 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेलची मोनोक्रोम लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी यात 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.   

Web Title: Up To 15800 Rupees Discount On OnePlus 9 5G  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.