OnePlus, Apple विसरा; चक्क 200MP चा कॅमेरा फोन घेऊन येतेय ही बडी कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 10:52 AM2021-02-03T10:52:54+5:302021-02-03T10:56:00+5:30
200MP camera Smartphone: सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा कॅमेरा सेन्सर लो लाईटमध्येही उत्तम फोटो काढणार आहे. 0.1 ल्युमिनस एवढा जरी काळोख असला तरीही चांगले फोटो निघणार आहेत. तसेच 10 बिट कलर सपोर्ट व 4K HDR रेकॉर्डिंगही करणार आहे.
बाजारात सध्या 48, 64, 108 मेगापिक्सलची चलती आहे. चांगल्या कॅमेराचे फोन हे OnePlus, Apple, Samsung कडेच आहेत असा विश्वास आहे. मात्र, आता याला छेद देण्यासाठी चीनची बडी कंपनी चक्क 200 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन घेऊन येत आहे.
हार्डवेअरमध्ये अग्रेसर असलेली कंपनी ZTE ही ZTE Axon 30 Pro लाँच करणार आहे. या फोनमध्ये 200MP चा कॅमेरा असल्याचे बोलले जात आहे. ZTE चे अध्यक्ष नी फेई यांनी चीनची सोशल मीडिया कंपनी Weibo ला तसे संकेत दिले आहेत. त्यांनी ZTE Axon 30 Pro मध्ये 2.7 अब्ज पिक्सल म्हणजेच जवळपास 200 मेगापिक्सलचा कॅमेरा या फोनचे मुख्य आकर्षण असल्याचे सांगितले आहे. हा सेन्सर सॅमसंग किंवा सोनीचा नाही तर फुजीफिल्म कंपनीचा असण्याची शक्यता आहे.
Xiaomi च्या दुसऱ्या ब्रँडचा Poco M3 स्मार्टफोन लाँच; लगेचच 1000 चा डिस्काऊंट
सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा कॅमेरा सेन्सर लो लाईटमध्येही उत्तम फोटो काढणार आहे. 0.1 ल्युमिनस एवढा जरी काळोख असला तरीही चांगले फोटो निघणार आहेत. तसेच 10 बिट कलर सपोर्ट व 4K HDR रेकॉर्डिंगही करणार आहे.
याफोनमध्ये आताचा सगळ्य़ात लेटेस्ट असा Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात येणार आहे. तसेच Spectra 580 image signal processor देखील देण्यात येणार आहे.
लाँचपूर्वीच पाहा फ्लॅगशिप स्मार्टफोन Oppo Find X3 Pro चा जबरदस्त लूक; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये डिस्प्लेखाली कॅमेरा असणार आहे. मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सलच्यादेखील इमेज काढू शकतो. यामध्ये 0.16 μm चे अपार्चर देण्यात आले आहे. हे जेवढे कमी असते तेवढा तो कॅमेरा चांगले फोटो आणि कमी प्रकाशात फोटो काढण्याची क्षमता ठेवतो. आता अॅपल, गुगलसारखी कंपनी 12 मेगापिक्सल कॅमेरामध्ये उत्तमोत्तम फोटो काढून देत असताना 200 मेगापिक्सलचा कॅमेरा किती जादू दाखवेल काहीच सांगता येत नाही. गुगल पिक्सलचा कॅमेरादेखील अत्युच्च दर्जाचे फोटो खेचतो. आणखी एक बाब म्हणजे झेडटीई या कंपनीचे हे फोन भारतात वापरले जायचे सोडा ऑनलाईवरही मिळत नाहीत. यामुळे या फोनच्या बड्या कॅमेराचा अनुभव तसा दूरचाच असणार आहे.