यूपीआयद्वारे 95000 लोकांची फसवणूक; जाणून घ्या कसे टाळता येईल स्कॅम?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 03:04 PM2023-05-30T15:04:52+5:302023-05-30T15:05:17+5:30

upi fraud cases : ऑनलाइन व्यवहारांसाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हे आपल्यामध्ये क्रांतीसारखे आले आहे. यूपीआयने भारतात व्यवहार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. 

upi fraud cases recorded more than 95000 in india 2022 how to protect from cyber attacks | यूपीआयद्वारे 95000 लोकांची फसवणूक; जाणून घ्या कसे टाळता येईल स्कॅम?

यूपीआयद्वारे 95000 लोकांची फसवणूक; जाणून घ्या कसे टाळता येईल स्कॅम?

googlenewsNext

भारतात डिजिटल व्यवहारांचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. ऑनलाइन शॉपिंग, शाळेची फी, पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी लोक डिजिटल पद्धतींचा अवलंब करत आहेत. ऑनलाइन व्यवहारांसाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हे आपल्यामध्ये क्रांतीसारखे आले आहे. यूपीआयने भारतात व्यवहार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. 

देशात मोठ्या प्रमाणावर रोखीचे व्यवहार होतात, पण आता यूपीआय पेमेंटची क्रेझही सातत्याने वाढत आहे. मात्र, यूपीआयच्या झपाट्याने वाढ होत असल्याने फसवणुकीची प्रकरणेही समोर येत आहेत. आजच्या काळात व्हॉट्सअॅप स्कॅम, पार्ट-टाइम जॉब स्कॅम, सिनेमा स्कॅम यांसारख्या ऑनलाइन स्कॅमची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. यूपीआय देखील स्कॅमर्सच्या नजरेतून सुटलेले नाही. यूपीआयद्वारे फसवणूक झाल्याची घटना नवीन नाही. 

गेल्या काही वर्षांपासून यूपीआय ​​फसवणुकीची हजारो प्रकरणे नोंदवली जात आहेत. हा आकडा झपाट्याने वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये यूपीआय फसवणुकीची 77,000 प्रकरणे नोंदवली गेली. 2021-22 मध्ये, यूपीआय फसवणूक प्रकरणांची संख्या 84,000 झाली. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2022-23 दरम्यान, देशात 95,000 हून अधिक यूपीआय फसवणुकीची प्रकरणे नोंदवण्यात आली. यूपीआयच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.

सायबर गुन्हेगार यूपीआयच्या माध्यमातून लोकांची अनेक प्रकारे फसवणूक करतात.
पैसे रिफंड मागण्याचा बहाना :
स्कॅमर्स लोकांच्या यूपीआय खात्यात पैसे ट्रान्सफर करतात आणि म्हणतात की, ते चुकून ट्रान्सफर झाले. यानंतर लोकांना हे पैसे परत करण्यास सांगितले जाते. त्यासाठी यूपीआयची लिंक पाठवली जाते. तुम्ही या लिंकवर क्लिक करताच, तुमच्या फोनचे नियंत्रण स्कॅमर्सकडे जाते आणि ते डिजिटल वॉलेट आणि बँक खात्यांमधून पैसे चोरतात.

QR कोडद्वारे फसवणूक : स्कॅमर्स QR कोडद्वारे फसवणूक करतात. सायबर ठग लोकांना क्यूआर कोड पाठवतात. तुम्ही UPI पिन टाकताच तुमच्या खात्यातून पैसे डेबिट केले जातात.

या पद्धती यूपीआय फसवणूक टाळण्यात मदत होऊ शकते
- जर कोणी म्हणत असेल की त्याने चुकून तुमच्या यूपीआय खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत, तर आधी त्यासंबंधी सखोल चौकशी करा. त्या व्यक्तीच्या ओळखीची पुष्टी करा आणि कोणतीही लिंक आली तर त्यावर क्लिक करू नका.
- तुमचा यूपीआय पिन कोणाशीही शेअर करू नका. तो फक्त स्वतःशी व्यवहार करण्यासाठी वापरा.
- लेटेस्ट स्कॅम आणि फ्रॉड करण्याच्या पद्धतींवर लक्ष ठेवा. यावरून तुम्हाला कळेल की स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी कसे डावपेच अवलंबतात.

Web Title: upi fraud cases recorded more than 95000 in india 2022 how to protect from cyber attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.