भारतानंतर US मध्ये देखील TikTok वर बंदी? Google-Apple ला अॅप काढून टाकण्याचे आदेश
By सिद्धेश जाधव | Published: June 30, 2022 03:27 PM2022-06-30T15:27:49+5:302022-06-30T15:28:13+5:30
TikTok अॅप प्ले स्टोर आणि अॅप्पल अॅप स्टोरवरून काढून टाकण्याचे आदेश गुगल आणि अॅप्पलला देण्यात आले आहेत.
TikTok वर भारताने जरी बंदी टाकली असली तरी जगभरात या व्हिडीओ शेयरिंग अॅपची लोकप्रियता कमी झाली नाही. उलट जगभरात सर्वाधिक डाउनलोड केल्या गेलेल्या अॅप्सच्या यादीत टिकटॉक गेले कित्येक महिने अग्रस्थानी आहे. युनाटेड स्टेट्समध्ये चीनी कनेक्शन असलेल्या ByteDance कंपनीचं अॅप TikTok आता USA मध्ये देखील बॅन होऊ शकतं. United States Federal Communications Commission (US-FCC) चे कमिशनर Brendan Carr यांनी अॅप्पल आणि गुगलला त्यांच्या अॅप स्टोर्सवरून काढून टाकण्यासाठी पत्र पाठवलं आहे.
US-FCC कमिशनरचं पत्र
Brendan Carr यांनी TikTok ला लक्ष्य करत म्हटलं आहे की, “हे अॅप फक्त एक व्हिडीओ अॅप नाही. हे मेंढ्याचं कातडं आहे. हे अॅप संवेदनशील डेटा गोळा करत आहे, जो रिपोर्ट्सनुसार, बीजिंगमधून अॅक्सेस केला जात आहे. याच्या मुळाशी टिकटॉक एक हेरगिरी करणार साधन आहे जे खाजगी आणि संवेदनशील डेटा मोठ्या प्रमाणावर गोळा करत आहे.”
Carr यांनी अॅप्पल आणि गुगलला हे अॅप याच्या गुप्त डेटा प्रॅक्टिससाठी काढून टाकण्यास सांगितलं आहे. ट्वीटच्या माध्यमातून दोन्ही कंपन्यांना पाठवण्यात आलेलं पत्र शेयर केलं आहे. 24 जूनला लिहिण्यात आलेल्या या पत्राला 8 जुलै पर्यंत उत्तर द्यावं लागेल. ज्यातून कंपन्यांना याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल की, “TikTok च्या फसव्या प्रतिनिधित्व आणि वागणुकीसह US युजर्सचा खाजगी आणि संवेदनशील डेटा बीजिंगमधील लोकांनी अॅक्सेस केल्यानं, कशाप्रकारे कोणत्याही अॅप स्टोरच्या पॉलिसीजचं उल्लंघन होत नाही.”
Carr यांनी पत्रात बजफीड न्यूजच्या रिपोर्टचा हवाला देऊन म्हटलं आहे की चीनमध्ये ByteDance चे कर्मचारी वारंवार अमेरिकन युजर डेटाचा वापर करत आहेत. पब्लिकेशनच्या माहितीनुसार TikTok च्या अंतर्गत मीटिंगच्या ऑडियो रेकॉर्डिंगमध्ये नऊ वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांनी चौदा वेगवेगळे विधान केले आहेत, ज्यातून सप्टेंबर 2021 आणि जानेवारी 2022 दरम्यान अमेरिकन युजर्स डेटा त्यांना मिळत होता, असं समजतं.