सोशल मीडियावर एक्टिव्ह राहिणं ठरतंय घातक; Dopamine मध्ये होते वाढ, 'असं' करा डिटॉक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 05:17 PM2024-08-26T17:17:42+5:302024-08-26T17:19:29+5:30
Dopamine : लोक सोशल मीडियावर बराच वेळ घालवू लागले आहेत. त्यामुळे लोकांच्या शरीरात डोपामाइनची लेव्हल वाढत आहे.
आजकाल देशातील लोक सोशल मीडियावर बराच वेळ घालवू लागले आहेत. त्यामुळे लोकांच्या शरीरात डोपामाइनची लेव्हल वाढत आहे. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की हे डोपामाइन म्हणजे काय? रिपोर्ट्सनुसार, डोपामाइन हे एक प्रकारचं केमिकल आहे जे आपल्या मेंदूमध्ये तयार होतं. हे मोटीवेशन आणि आनंदात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. मात्र डोपामाइनचे जास्त प्रमाण हे हानिकारक आहे.
डोपामाइन म्हणजे काय?
डोपामाइन एक न्यूरोट्रान्समीटर आहे जो मेंदूमध्ये जातो आणि आपल्याला अशा गोष्टी करण्यास प्रेरित करतो ज्यामुळे आपल्याला त्वरित आनंद मिळतो. आता सोशल मीडिया वापरणे किंवा व्हिडीओ गेम्स खेळल्याने व्यक्तीच्या मेंदूत डोपामाइन रिलीज होतं आणि आता त्या व्यक्तीला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करण्यास प्रवृत्त करतं. म्हणूनच जास्त डोपामाइन रिलीज होणं देखील धोकादायक ठरू शकतं.
आरोग्यासाठी हानिकारक
डोपामाइनचा अतिरेक शरीरासाठी हानिकारक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोपामाइन जास्त प्रमाणात रिलीज झाल्यामुळे व्यक्तीमध्ये संयमाची कमतरता भासू लागते. याशिवाय ते मानसिकदृष्ट्याही कमजोर होऊ लागतात. कोणत्याही गोष्टीच्या व्यसनामुळे माणूस आपला स्वभाव गमावू शकतो. जास्त प्रमाणात डोपामाइन रिलीज झाल्याने चिडचिड होऊ लागते.
सोशल मीडियामुळे रिलीज होतं डोपामाइन
पूर्वी सामान्य गोष्टी लोकांना आनंद देत असत, त्यामुळे डोपामाइन पुन्हा तेच काम करण्यास प्रवृत्त करत असे. पण आता लोक सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात. सोशल मीडियावर एक्टिव्ह राहिल्यानंतर लोकांच्या मेंदूमध्ये डोपामाइन रिलीज होतं. मिशिगन युनिव्हर्सिटीच्या मते, जगभरातील सुमारे २ कोटी लोकांना सोशल मीडियाचं व्यसन आहे. हे टाळण्यासाठी अनेक तरुण डोपामाइन डिटॉक्सचाही अवलंब करत आहेत.
डोपामाइन डिटॉक्स कसं करायचं?
डोपामाइन हिटची निवड - लोकांना अशा एक्टिव्हिटीकडे लक्ष द्यावं लागेल ज्यामुळे डोपामाइन लवकर रिलीज होतं. सोशल मीडिया, तासनतास गेम खेळणं, जंक फूडचं सेवन करणं अशा गोष्टींमुळे डोपामाइन लगेच रिलीज होतं. त्यामुळेच डिटॉक्ससाठी या सर्व गोष्टींपासून दूर राहणं गरजेचं आहे.
लिमिट सेट करा - जर तुम्ही पहिल्यांदाच डोपामाइन डिटॉक्स करत असाल, तर दिवसाच्या सुरुवातीला आणि झोपण्यापूर्वी २ ते ३ तास आधी डोपामाइन लवकर रिलीज करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा.
लो-डोपामाइन एक्टिव्हिटीवर फोकस करा - डोपामाइन डिटॉक्ससाठी, आपण कमी डोपामाइन सोडणाऱ्या एक्टिव्हिटीवर फोकस केलं पाहिजे. पुस्तक वाचणे, ध्यानधारणा, बागकाम यासारख्या गोष्टींकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. असं केल्याने तुम्ही डोपामाइन डिटॉक्स करू शकता.