फेसबुकनंतर इन्स्टाग्रामवरील युजरचा डेटा धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 02:45 PM2018-11-19T14:45:20+5:302018-11-19T14:45:59+5:30
फेसबुकचा डेटा लीकप्रकरणी मालक झकरबर्ग याच्यावर अध्यक्षपद सोडण्याचा दबाव वाढत आहे.
गेल्या काही दिवसांपासून फेसबुकच्या डेटा चोरी आणि प्रणालीमध्ये गडबडी आढळून आल्यानंतर आता फेसबुकनेच विकत घेतलेले इन्स्टाग्रामही युजर्ससाठी धोक्याचे ठरत आहे. इन्स्टाग्रामचाही डेटा चोरीला गेल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून अॅपमधील एका त्रुटीमुळे हे घडल्याचा दावा 'द व्हर्ज'ने केला आहे.
फेसबुकचा डेटा लीकप्रकरणी मालक झकरबर्ग याच्यावर अध्यक्षपद सोडण्याचा दबाव वाढत आहे. अशातच इन्स्टाग्रामही लीक झाल्याने फेसबुकवरील विश्वासार्हता उडत चालली आहे. इन्स्टाग्रामच्या 'डेटा डाउनलोड टूल'मध्ये त्रुटी आढळल्याने त्याद्वारे युजरचा डेटा लीक होत आहे. यामुळे युजरचे पासवर्ड उघड करण्यात आले आहेत. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही समस्या समजली असून लीक होण्याची वेळ सुरुवातीची असल्याने जादा युजरची माहिती उघड झाली आहे.
कंपनीने युजरना त्यांचे पासवर्ड बदलण्यास सांगितले आहे. सध्या या त्रुटीला दूर करण्यात आले असले तरीही काही युजरचे पासवर्ड लीक झाल्याने ते बदलावे लागणार आहेत.