'हे' अ‍ॅप्स वापरून लोक लपवतायत आपला नंबर, समोरच्याला दिसतो VIP नंबर 

By सिद्धेश जाधव | Published: March 12, 2022 07:48 PM2022-03-12T19:48:31+5:302022-03-12T19:49:08+5:30

Google Play Store वरील अ‍ॅप्सचा वापर करून VIP Call केले जात आहेत. या Fake Call Apps च्या माध्यमातून युजर्स त्यांना हवा तो नंबर निवडून कॉल करू शकतात.  

Users hiding their identity using fake call apps available on google play store  | 'हे' अ‍ॅप्स वापरून लोक लपवतायत आपला नंबर, समोरच्याला दिसतो VIP नंबर 

'हे' अ‍ॅप्स वापरून लोक लपवतायत आपला नंबर, समोरच्याला दिसतो VIP नंबर 

googlenewsNext

Android प्लॅटफॉर्मवर कोट्यवधी अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यातील काही अ‍ॅप्स युजर्सच्या प्रायव्हसीची काळजी घेत नाहीत. तर काही अ‍ॅप्स युजर्सना त्यांची ओळख लपवण्यासाठी मदत करतात. या अ‍ॅप्सचा अनेकदा गैरफायदा देखील घेतला जातो. Google Play Store वर एक असे देखील अ‍ॅप्स आहेत ज्यांचा वापर ऐकून तुम्ही थक्क व्हाल.  

प्ले स्टोरवर Fake Call Apps उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीनं युजर्स कोणालाही आपल्या आवडीच्या नंबरवरून कॉल करू शकतात. म्हणजे तुम्ही एखादा VIP नंबर निवडून त्यावरून कॉल करू शकता किंवा तुमच्या आवडीचा नंबर तयार करून कॉल करू शकता. यामुळे फक्त युजरची ओळख लपत नाही तर ते दुसऱ्याच्या नंबरवरून कॉल करून त्याची ओळख घेऊ शकतात.  

गुगलनं अजूनतरी अशा अ‍ॅप्सवर बंदी घातली नाही. याआधी देखील या अ‍ॅप्सचा गैरवापर झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. Fake Call App प्ले स्टोरवर मोफत डाउनलोड करता येतात. परंतु यावरून कॉल करण्यासाठी क्रेडिट खर्च करावे लागतात. जे आपल्या नेहमीच्या कॉल रेट पेक्षा कितीतरी महागडे आहेत. परंतु अनेक युजर्स या अ‍ॅप वापर विआयपी नंबर म्हणून करतात. तर काही यांचा गैरफायदा घेतात.  

हे देखील वाचा:

Web Title: Users hiding their identity using fake call apps available on google play store 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.