नथिंग स्मार्टफोनला झालंय तरी काय? अचानक बंदचा 'धक्का' अन् पुन्हा चालू; युजर्स चिंतेत
By ओमकार संकपाळ | Published: August 2, 2023 01:05 PM2023-08-02T13:05:45+5:302023-08-02T13:06:11+5:30
भारतासह जगभरातील ग्लोबल मार्केटमध्ये ११ जुलै रोजी नथिंग फोन २ लॉन्च झाला.
nothing phone problems : भारतासह जगभरातील ग्लोबल मार्केटमध्ये ११ जुलै रोजी नथिंग फोन २ लॉन्च झाला. आपल्या अनोख्या फिचर्समुळे ग्राहकांना आकर्षित करण्यात या स्मार्टफोनला यश आले. पण, लॉन्च झाल्यानंतर लगेचच नथिंग स्मार्टफोनच्या युजर्संना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. नथिंगचा फोन अचानक रिस्टार्ट होत असून आपोआप पुन्हा चालू होत आहे. फोन रिबूट होत असल्यामुळे युजर्स चिंतेत आहेत. खरं तर कोणत्याही क्षणी मोबाईल अचानक बंद होत असल्याने नथिंग युजर्स मेटाकुटीला आल्याचे दिसते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून नथिंग युजर्स ही समस्या मांडत आहेत. ट्विटर युजर अभिषेद यादवने सांगितले की, नथिंग फोन २ च्या युजर्संना Crashdump Issue चा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्मार्टफोन अचानक चालू बंद होत आहे, ज्याचा त्याने फोटो देखील शेअर केला आहे.
नथिंगचे युजर्स चिंतेत
Lots of Nothing Phone 2 users facing Crashdump issue where smartphones reboot automatically after every 1-2 hours.
— Abhishek Yadav (@yabhishekhd) July 30, 2023
.@nothingsupportpic.twitter.com/OqCl4DPujg
नथिंग फोन २ ची वैशिष्ट्ये
नथिंग फोन (१) ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीने नथिंग (२) देखील लॉन्च केला. Snapdragon 8+ Gen १ प्रोसेसर नथिंग फोन २ मध्ये वापरला गेला आहे, जो LPDDR5 RAM आणि UFS ३.१ स्टोरेजसह फोनचे महत्त्व वाढवतो. नथिंगचा हा नवीन स्मार्टफोन NothingOS 2.0 आधारित Android १३ वर काम करतो. तसेच या फोनमध्ये 4700mAh बॅटरी आहे, जी 33W वायर आणि 15W वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते. याशिवाय नथिंग फोन २ मध्ये ६.७ इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यामुळे युजर्संना १०८०×२४१२ स्क्रीन रिझोल्यूशन आणि १६०० nits चा पीक ब्राइटनेस मिळतो आहे.