Twitter ने कमाईचा नवा मार्ग शोधला! ब्ल्यू टिकसाठी वापरकर्त्यांच्या खिशाला लागणार कात्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 10:37 AM2022-10-31T10:37:36+5:302022-10-31T10:39:33+5:30

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी Twitter खरेदी केले. मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेताच महत्वपूर्ण बदल करण्यास सुरुवात केली आहे. आता ट्विटरवर ब्लू टिक घेणाऱ्यांसाठी प्रत्येक महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत.

Users will now have to pay monthly for Blue Tick on Twitter | Twitter ने कमाईचा नवा मार्ग शोधला! ब्ल्यू टिकसाठी वापरकर्त्यांच्या खिशाला लागणार कात्री

Twitter ने कमाईचा नवा मार्ग शोधला! ब्ल्यू टिकसाठी वापरकर्त्यांच्या खिशाला लागणार कात्री

googlenewsNext

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी Twitter खरेदी केले. मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेताच महत्वपूर्ण बदल करण्यास सुरुवात केली आहे. आता ट्विटरवर ब्लू टिक घेणाऱ्यांसाठी प्रत्येक महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. यासाठी ट्विटरवर ब्लू टिक सबक्रिप्शनचा ऑप्शन येणार आहे. त्यामुळे आता ट्विटरच्या कमाईचा आणखी एक मार्ग वाढणार आहे, तर ब्लू टिक वापरणाऱ्या वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

एका अहवावरुन ही माहिती समोर आली आहे. ब्लू टिक मिळाल्यानंतर सदस्यता घेण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी आहे, अन्यथा वापरकर्त्यांना त्यांचे ब्लू टिक गमवावे लागेल.

ट्विटरसाठी अब्जाधीश मस्कने शेअर्स विकले, कर्जही काढले; पहिल्याच दिवशी सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

७ नोव्हेंबरपर्यंत हे फीचर सुरू करण्याची मुदत दिली आहे, असं या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना रविवारी ३० ऑक्टोबरला सांगण्यात आले आहे. अन्यथा त्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.

ट्विटर, जगातील सर्वात प्रभावशाली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ताब्यात घेतल्यानंतर, इलॉन मस्क यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे की, ट्विटर व्हेरिफिकेश प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी काम करत आहे.

किती रुपये भरावे लागणार 

आता ट्विटवर ब्लू टिकसाठी आपल्याला पैसे मोजावे लागणार आहेत. हे पैसे एकदा नाहीतर प्रत्येक महिन्याला भरावे लागणार आहेत. यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. आता यूजर्ंसना प्रति महिना १९.९९ डॉलर जवळपास १६४६ रुपये प्रत्येक महिन्याला आपल्याला भरावे लागणार आहेत, त्यामुळे आता ब्लू टिक वापरणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 

Twitter Blue मागील वर्षी जूनमध्ये वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आले होते, ही कंपनीची पहिली सदस्यता सेवा आहे जी वापरकर्त्यांना महिन्याचे सबस्क्रिप्शन आधारावर प्रीमियम फिचर देत आहे. यासह आता ट्विट इडीटही करता येणार आहे. 

पहिल्याच दिवशी सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

अब्जाधीश इलॉन मस्क यांनी ट्विटरचे तब्बल ४४ अब्ज डॉलर्सचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी ‘पक्षी मुक्त झाला आहे,’ असे ट्वीट करीत आनंद व्यक्त केला. यासाठी त्यांनी टेस्लाचे काही शेअर्स १५.५ अब्ज डॉलर्सला विकले तर १३ अब्ज डॉलर्सचे कर्जही काढले. मात्र हा प्रसंग ट्विटरमधील वरिष्ठांसाठी दु:खाचा ठरला. मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल व कायदेशीर कार्यकारी विजया गड्डे यांच्यासह चार उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. 

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीने गुरुवारी ट्विटर खरेदीचा करार पूर्ण केला, असे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले असून, चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकत मस्क यांनी ट्विटरची साफसफाई सुरू केल्याचे त्यात म्हटले. अग्रवाल, गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल व सल्लागार सीन एजेट यांचा समावेश यांच्यावर तूर्तास मस्क यांची कुऱ्हाड कोसळली.  (Twitter Latest News)

Web Title: Users will now have to pay monthly for Blue Tick on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.