TikTok वापरताय....सावधान! तुमची माहिती जगभर विकतायत 'ही' अॅप
By अोंकार करंबेळकर | Published: January 24, 2019 09:28 AM2019-01-24T09:28:08+5:302019-01-24T09:29:10+5:30
चीनच्या फोनसोबत चीनी अॅपनी मोबाईलवर चांगलीच पसंती मिळवली आहे.
नवी दिल्ली : स्मार्टफोनमध्ये बऱ्याच अॅपचा बोलबाला झाला आहे. यामध्ये TikTok, UC Browser, ShareIt ही चायनीज अॅपही आहेत. मात्र, वेळीच सावध झालेले बरे. ही अॅप खासगी माहितीचा अॅक्सेस मागतात. मात्र, या अॅपना खासगी माहिती वापरण्याची परवानगी देणे किती महागात पडू शकते? तुमचे मॅसेज, कॉन्टॅक्टपासून फोटो आणि व्हिडिओ ही अॅप त्रयस्थ कंपन्यांना विकत असतात. याचा खुलासा Arrka Consulting ने केला आहे.
चीनच्या फोनसोबत चीनी अॅपनी मोबाईलवर चांगलीच पसंती मिळवली आहे. मात्र ही अॅप भारतीयांची त्यांच्या कामासाठी गरजेची नसलेली माहितीही चोरत आहेत. ही चोरलेली माहिती या अॅपच्या कंपन्या परदेशी एजन्सीना विकत आहेत. या अॅपमध्ये Helo, Shareit, TikTok, UC Browser, Vigo Video, Beauty Plus, Club factory Everything, News-Dog, UC news आणि VMate यांचा समावेश आहे. ही अॅप 10 पैकी 8 मोबाईलवर इन्स्टॉल असतात. ही अॅप युजरच्या मायक्रोफोनचाही अॅक्सेस मागतात. तसेच कॅमेऱ्याचाही अॅक्सेस मागितला जातो.
Arrka Consulting चे संस्थापक संदीप राव यांच्या मतानुसार जगभरातील सर्वाधिक वापरली जाणारी 50 आणि चीनची 10 अॅप युजरचा 45 टक्के जादा माहितीचा अक्सेस मागतात. ही अॅप युजरची खासगी माहिती 7 परदेशी कंपन्यांना विकत आहेत. तर TikTok गोळा केलेली माहिती चीनी टेलिकॉम कंपन्यांना पाठविली जात आहे. तर Vigo Video, Beauty Plus आणि Tencent co ही अॅप Meitu ला युजरची माहिती पाठवत असल्याचे निदर्शनास आले आहे . युसी ब्राऊजर युजरची माहिती मूळ कंपनी अलीबाबाला पाठवत आहे.