शाओमी 'रेडमी ५ए'चे हे व्हेरियंट आता मिळणार शॉपीजमध्येही

By शेखर पाटील | Published: December 27, 2017 09:17 AM2017-12-27T09:17:56+5:302017-12-27T12:21:16+5:30

शाओमी कंपनीने अलीकडेच सादर केलेल्या रेडमी ५ए या स्मार्टफोनचे ३ जीबी रॅम असणारे व्हेरियंट आता ग्राहकांना ऑफलाईन पध्दतीत अर्थात देशभरातील शॉपीजमधूनही खरेदी करता येणार आहे.

This variant of Shaomi 'Redmi 5A' will also be available in the Shops too | शाओमी 'रेडमी ५ए'चे हे व्हेरियंट आता मिळणार शॉपीजमध्येही

शाओमी 'रेडमी ५ए'चे हे व्हेरियंट आता मिळणार शॉपीजमध्येही

Next

शाओमी कंपनीने नोव्हेंबरच्या अखेरीस 'देश का स्मार्टफोन' या कॅचलाईनसह रेडमी ५ए हा स्मार्टफोन लाँच केला होता. याचे २ जीबी रॅम व १६ जीबी स्टोअरेचे व्हेरियंट 4 हजार 999 तर ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेजचे व्हेरियंट 6 हजार 999 रूपये मूल्यात सादर करण्यात आले होते. अत्यंत किफायतशीर दरात उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणार्‍या या स्मार्टफोनने एंट्री लेव्हल विभागात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आजवर हे दोन्ही व्हेरियंट फक्त फ्लिपकार्ट हे शॉपिंग पोर्टल आणि कंपनीच्या 'मी.कॉम' या संकेतस्थळावरून खरेदी करता येत होते. आता मात्र यातील ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेजचे व्हेरियंटग्राहकांना देशभरातील विविध शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आल्याची घोषणा शाओमी कंपनीने केली आहे. अर्थात हे व्हेरियट मूळ  मूल्यापेक्षा ५०० रूपयांना जास्त म्हणजे ७ हजार 499 रूपयात ग्राहकांना शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आले आहे.  या माध्यमातून ऑफलाईन मार्केटमध्ये वाटा वाढविण्याची शाओमीची रणनिती दिसून येत आहे.

फिचर्सचा विचार केला असता, शाओमी रेडमी ५ए या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा, १६:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले असेल. वर नमूद केल्यानुसार यात ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येईल. यात १३ व ५ मेगापिक्सल्सचे कॅमेरे आहेत. यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून यावर शाओमी कंपनीचा एमआययुआय ९ हा युजर इंटरफेस असेल. यामध्ये २+१ कार्ड स्लॉट असेल. अर्थात यात दोन सीमकार्ड आणि एक मायक्रो-एसडी कार्ड एकाच वेळी वापरता येईल. याच्या मागील बाजूस ड्युअल ग्रॅफाईट शीट लावण्यात आली आहे. यामुळे बाह्य तापमानापेक्षा याचे तापमान किमान एक अंशाने कमी राहणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच यातील चार्जर हे ३८० व्होल्टपर्यंतच्या सपोर्टने युक्त असेल. म्हणजेच उच्च व्होल्टेज असतांनाही हे चार्जर काम करू शकेल.

Web Title: This variant of Shaomi 'Redmi 5A' will also be available in the Shops too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.