सावधान! 7 जानेवारीपासून सिमकार्ड ब्लॉक होणार; आजच हे काम करा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 02:35 PM2022-01-04T14:35:12+5:302022-01-04T15:24:17+5:30
Mobile SIM Card Rule: येत्या शुक्रवार म्हणजे 7 जानेवारीपासून देशातील अनेक सिमकार्ड बंद होणार आहेत. हा नियम गेल्यावर्षी 7 डिसेंबर 2021 रोजी लागू करण्यात आला होता.
Mobile SIM Card Rule: दूरसंचार विभाग (DoT) नं गेल्या महिन्यात 7 डिसेंबर 2021 रोजी एक आदेश जारी केला होता. त्यानुसार, 9 पेक्षा जास्त सिमकार्ड धारकांना सिमकार्ड व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य असेल. असं न केल्यास तुमचं सिमकार्ड बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या व्हेरिफिकेशनसाठी DoT कडून 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती, जी 6 जानेवारी 2022 ला संपत आहे.
जर तुमच्या नावावर 9 पेक्षा जास्त सिम रजिस्टर्ड असतील तर तुम्हाला 7 जानेवारीआधी सिम कार्डचं व्हेरिफिकेशन करावं लागेल. युजरकडे अतिरिक्त सिमकार्ड सरेंडर करण्याचा देखील पर्याय असेल. युजरला व्हेरिफिकेशनचं नोटिफिकेशन येईल. जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या सिमची आउटगोइंग बंद केली जाऊ शकते. तसेच 45 दिवसांच्या आत इनकमिंग कॉल्सची सेवा देखील बंद केली जाईल.
नोटिफिफाय केलेला सिम व्हेरिफाय न झाल्यास तो 60 दिवसांच्या आत बंद केला जाईल. तसेच इंटरनॅशनल रोमिंग, आजारी आणि दिव्यांग व्यक्तींना व्हेरिफिकेशनसाठी 30 दिवस अतिरिक्त देण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर आणि उत्तर पूर्वेकडील राज्यांतील नागरिकांना जास्तीत जास्त 6 सिम बाळगण्याची मुभा आहे. तर उर्वरित भारतात जास्तीत जास्त 9 सिम वापरता येतील.
तुमच्या नावावर किती सिम आहेत ते असे बघा
- सर्वप्रथम tafcop.dgtelecom.gov.in वर जा.
- इथे तुमचा मोबाईल नंबर सबमिट करा आणि मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून नंबर व्हेरिफाय करा.
- व्हेरिफिकेशननंतर सर्व मोबाईल नंबरची लिस्ट येईल, जे तुमच्या आयडीवर नोंदवलेले आहेत.
- जर तुम्ही वापरत नसलेला एखादा चालू नंबर असेल तर तुम्ही त्या नंबरची तक्रार याच पोर्टलवर करू शकता.
- जर नंबर तुमच्या ओळखपत्रावर असेल आणि तुम्ही वापरत नसाल तर तो ब्लॉक केला जाईल.
हे देखील वाचा:
सॉलिड टॅबलेट! 7770mAh Battery, 11 इंचाचा मोठा डिस्प्ले; Motorola Moto Tab G70 आला फ्लिपकार्टवर