VI Data Leak: व्होडाफोन आयडिया ग्राहकांना मोठा झटका! ३० कोटी युजर्सचा डेटा लीक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 09:07 AM2022-08-30T09:07:17+5:302022-08-30T09:07:36+5:30
Vodafone Idea च्या लाखो ग्राहकांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला कायमस्वरुपी धोका निर्माण होईल, असे CyberX9 ने म्हटले आहे.
व्होडाफोन आयडियाला मोठा झटका बसला आहे. कंपनीच्या ग्राहकांचा मोठा डेटा लीक झाला आहे. यामध्ये अधिकांश पोस्टपेड युजर्स आहेत. सायबर सुरक्षा कंपनी CyberX9 ने हा दावा केला आहे.
व्होडाफोन-आयडियाच्या जवळपास तीस कोटी ग्राहकांचा सर्व डेटा लीक झाला आहे. यामध्ये २० कोटी पोस्टपेड ग्राहक आहेत. ग्राहकांचे फोन नंबर, पत्ते, कॉल लॉग, एसएमएस रेकॉर्ड आणि मोबाईल इंटरनेट वापराची माहिती लीक झाली आहे.
या दाव्यानंतर व्होडाफोनने या दाव्याचे खंडन केले आहे. तसेच जर आम्हाला जर डाटा लीकबाबत समजले तर त्यावर लगेटट कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कथितरित्या म्हटले आहे. या डेटामध्ये यामध्ये Vi ग्राहकाचा फोन नंबर आणि पर्यायी संपर्क क्रमांक, पत्ते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे तपशील याचीही माहिती आहे. Vodafone Idea च्या लाखो ग्राहकांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला कायमस्वरुपी धोका निर्माण होईल, असे CyberX9 ने म्हटले आहे.
लवकरच कंपनीचे ५जी
व्हीआयने पुण्यात 5G च्या चाचण्या घेतल्या आहेत. यामुळे लवकरच व्होडाफोनही भारतात फाईव्ह जी लाँच करेल असे दिसत आहे. व्होडाफोनने ही सेवा कधीपर्यंत लाँच केली जाईल याची अधिकृत माहिती दिलेली नाहीय. मात्र, टेलिकॉम इंडस्ट्रीतील सुत्रांनुसार कंपनी याच महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्येच 5G सर्विस लाँच करण्याची शक्यता आहे. ही सेवा सुरुवातीला अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे या १३ शहरांत केली जाणार आहे.