Jio नव्हे तर ही कंपनी देते चांगली कॉल क्वॉलिटी; TRAI च्या रिपोर्टमधून झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 09:19 PM2022-05-18T21:19:15+5:302022-05-18T21:19:29+5:30
ट्रायचा एप्रिल 2022 चा रिपोर्टसमोर आला आहे. यातून टेलिकॉम कंपन्यांच्या व्हॉइस क्वॉलिटी आणि 4G स्पीडची माहिती मिळाली आहे.
टेलीकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) नं एप्रिल 2022 चा डेटा एका रिपोर्टमधून जारी केला आहे. या रिपोर्टनुसार एप्रिल 2022 मध्ये इंडोर आणि आउटडोर व्हॉइस कॉल क्वॉलिटीमध्ये वोडाफोन आयडिया (Vi) नं पहिला क्रमांक मिळवला आहे. दुसऱ्या स्थानावर बीएसएनएल, तिसऱ्या क्रमांकावर जियो तर एयरटेल शेवटच्या स्थानावर राहिली आहे.
एप्रिलमध्ये वोडाफोन आयडियाच्या ग्राहकांना कॉलिंगसाठी बेस्ट ऑडियो क्वॉलिटी मिळाली आहे. ही माहिती TRAI MyCall पोर्टलवर Vi ला मिलेल्या रेटिंगवर आधारित आहे. इथे ग्राहकांनी व्हॉइस कॉल क्वॉलिटीच्या बाबतीत वीला 5 पैकी सरासरी 4.1 रेटिंग दिली आहे. एप्रिलमध्ये व्हॉइस क्वॉलिटीच्या बाबतीत 4+ रेटिंग फक्त VI ला मिळाली आहे.
अपलोड स्पीडमध्ये देखील पुढे
ट्रायच्या रिपोर्टनुसार, एप्रिल 2022 मध्ये Vi च्या 4G नेटवर्कचा सरासरी अपलोड स्पीड 8.2Mbps होता, जो सर्वाधिक आहे. याच काळात दुसऱ्या स्थानावर असलेल्या Jio नं सरासरी 7.6Mbps अपलोड स्पीड दिला होता. Airtel आणि BSNL चा सरासरी अपलोड स्पीड अनुक्रमे 6.1Mbps आणि 5Mbps होता. विआयचा 4जी डाउनलोड स्पीड एप्रिलमध्ये 17.7 एमबीपीएस होता. बीएसएनएलचा स्पीड 5.9 एमबीपीएस आणि एयरटेलचा 14.1 एमबीपीएस होता.
विक्रमी 5G स्पीड
5G स्पेक्ट्रमच्या लिलावाच्या आधी वी Vodafone Idea नं आपल्या 5G नेटवर्कची क्षमता देशाला दाखवून दिली आहे. टेलिकॉम कंपनीनं 5.92Gbps चा टॉप स्पीड पुण्यात झालेल्या चाचण्यांमध्ये मिळवला आहे. कंपनीनं याआधी 4Gbps स्पीडची नोंद केली होती. एयरटेल आणि जियोच्या 5G स्पीडपेक्षा हा वेग जास्त असला तरी कंपनीनं यात सिंगल टेस्ट डिवाइस पद्धतीचा वापर केला आहे. ज्यात अन्य डिवाइस 5G नेटवर्कपासून दूर ठेवले जातात. जास्त डिवाइस जोडल्यास हा वेग बदलू शकतो.