कुठेही मिळवा 4G वाय-फाय; एक साथ 10 डिवाइसमध्ये मिळणार हाय-स्पीड इंटरनेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 05:10 PM2022-03-25T17:10:58+5:302022-03-25T17:11:49+5:30

Vi MiFi एक पोर्टेबल 4जी वायरलेस राउटर आहे जो 150 Mbps पर्यंतच्या इंटरनेट स्पीड देऊ शकतो. यावर एक साथ 10 डिवाइस कनेक्ट करता येतात.  

Vi MiFi Portable 4G Wireless Router Launch In India Price And Details  | कुठेही मिळवा 4G वाय-फाय; एक साथ 10 डिवाइसमध्ये मिळणार हाय-स्पीड इंटरनेट 

कुठेही मिळवा 4G वाय-फाय; एक साथ 10 डिवाइसमध्ये मिळणार हाय-स्पीड इंटरनेट 

Next

Vodafone Idea भारतात आपला नवीन वायरलेस राउटर सादर केला आहे. Vi MiFi Portable 4G वायरलेस राउटर विआय पोस्टपेड कनेक्शनसोबत वापरता येईल. हा पर्सनल हॉटस्पॉट तुम्हाला 150Mbps पर्यंतचा इंटरनेट स्पीड देऊ शकतो. तसेच एकाचवेळी 10 डिवाइसच्या Wi-Fi शी कनेक्ट करता येतील. म्हणजे तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी या डिवाइसच्या वाय-फायचा वापर करू शकता.  

Vi MiFi ची किंमत 

Vi MiFi Portable 4G राउटरची किंमत 2,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा राउटर Vi फॅमिली पोस्टपेड प्लॅनसह अ‍ॅड-ऑन म्हणून विकत घेता येईल. 399 रुपयांच्या बेसिक पोस्टपेड प्लॅन असलेले ग्राहक देखील हा हॉटस्पॉट डिवाइस विकत घेऊ शकतात. कंपनीनं या डिवाइससोबत 1 वर्षाची वॉरंटी दली आहे. के रूप मध्ये पण विकत घेता येईल. Vi चे 699 रुपये, 999 रुपये आणि 1,299 रुपयांचे फॅमिली पोस्टपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. तसेच 399 रुपये, 499 रुपये आणि 699 रुपयांच्या एंटरटेनमेंट पोस्टपेड प्लॅन्ससोबत देखील या हॉटस्पॉटचा वापर करता येईल.  

Vi MiFi चे स्पेसिफिकेशन्स 

विआय मायफाय पोर्टेबल राउटरमध्ये 2,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी सिंगल चार्जवर 5 तास वापरता येते. तुम्ही तुमच्या घरच्या वाय-फायला बॅकअप म्हणून देखील या डिवाइसचा विचार करू शकता. यात 150Mbps चा इंटरनेट स्पीड मिळतो. तसेच या वायरलेस राउटरसोबत स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही किंवा CCTV कॅमेरा सारखे 10 डिवाइस कनेक्ट करू शकता.  

Web Title: Vi MiFi Portable 4G Wireless Router Launch In India Price And Details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.