Vi आणि Nokia हायस्पीड 5G इंटरनेटसाठी आले एकत्र; तोडले आजवरचे सर्व रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 10:40 PM2021-11-11T22:40:05+5:302021-11-11T22:40:23+5:30

Vodafone-Idea नं नोकियासोबत आपल्या तांत्रिक भागीदारीची केली घोषणा. यशस्वीरित्या केली 5G ची चाचणी.

vi partners with nokia fir high speed 5g connectivity broke all records airtel reliance jio mtnl | Vi आणि Nokia हायस्पीड 5G इंटरनेटसाठी आले एकत्र; तोडले आजवरचे सर्व रेकॉर्ड

Vi आणि Nokia हायस्पीड 5G इंटरनेटसाठी आले एकत्र; तोडले आजवरचे सर्व रेकॉर्ड

Next

Vodafone-Idea 5G Services : व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या कंपनीनं नोकिया (Nokia) सोबत आपल्या तांत्रिक भागीदारीची घोषणा केली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी ग्रामीण भागामध्ये यशस्वीरित्या 5G सेवांची चाचणी केली आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे ग्रामीण ब्रॉडबॅन्ड कनेक्टिव्हीटी देण्यासाठी सरकारद्वारे 5G चाचण्यांसाठी देण्यात आलेल्या 3.5GHz स्पेक्ट्रम बँडमध्ये 5G चा वापर करण्यात आला. व्होडाफोनआयडिया लिमिटेडला नोकियाकडून हार्डवेअर सपोर्ट उपलब्ध करून देण्यात येत आहे. दोन्ही कंपन्यांनी मिळून 10 नोव्हेंबर रोजी ही चाचणी केली.

नोकिया आणि व्होडाफोन आयडियानं मिळून 5G चाचणीदरम्यान 100Mbps चा टॉप स्पीड मिळवला. व्होडाफोन आयडियाकडून Nokia च्या AirScale रेडिओ पोर्टफोलिओ आणि मायक्रोवेब ई बँडचा वापर केला जातो. यापूर्वीही दोन्ही कंपन्यांनी मिळून 5G नेटवर्कची चाचणी केली होती. त्यावेळी व्होडाफोन आयडियाला सर्वाधिक 9.85Gbps चा स्पीड मिळाला होता. हा स्पीड Airtel आणि Reliance Jio पेक्षा 10 पटींनी अदिक आहे. अशातच 5G कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत रिलायन्स जिओ व्होडाफोनच्या मागे पडेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

परंतु हा सुरूवातीचा टप्पा असून यामध्ये अनेक कंपन्या निरनिराळी फ्रिक्वेन्सी आणि निरनिराळ्या हार्डवेअर सपोर्टवर 5G टेस्टिंग करत आहे. अशातच पुढील काळात काय होईल हे सांगता येणार नाही. परंतु सद्यस्थितीत रिलायन्स जिओ ही कंपनी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. Jio व्यतिरिक्त  Bharti Airtel, MTNL भारतात 5G च्या चाचणी करत आहेत. जिओ आणि एअरटेलनं चाचणीदरम्यान 1Gbps चा टॉप स्पीड मिळवला होता. व्होडाफोनचा हा स्पीड बँक एन्ड डेटा ट्रान्समिशनवर मिळाला आहे. याचाच अर्थ कनेक्टिंग मोबाईल बेस स्टेशन नेटवर्क आहे. 

Vi आणि Airtel या कंपन्या 5G च्या चाचण्यांसाठी अन्य टेलिकॉम पार्ट मॅन्युफॅक्चरर Ericsson, Nokia आणि Samsung यांच्यावर अवलंबून आहे.  तर रिलायन्स जिओ ही कंपनी स्वत:च्याच तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.

Web Title: vi partners with nokia fir high speed 5g connectivity broke all records airtel reliance jio mtnl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.